“पहिल्यांदाच रोमँटिक भूमिकेत दिसणार” ‘इन्स्पेक्टर मंजू’मध्ये स्नेहल शिदमची हटके एन्ट्री
भूमिकेबद्दल अभिनेत्री स्नेहल शिदम म्हणाली की, " पुन्हा एकदा सन मराठीच्या सुपरहिट मालिकेत काम करण्याची संधी मिळाली याचा प्रचंड आनंद आहे.
Snehal Shidam’s unique entry in ‘Inspector Manju’ : ‘सन मराठी’ वरील ‘इन्स्पेक्टर मंजू’ या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या नव्या प्रोमो मध्ये अभिनेत्री स्नेहल शिदम एका वेगळ्या अंदाजात दिसून येतेय. मालिकेत आर्यनच्या आत्याची महत्त्वपूर्ण भूमिका स्नेहल साकारताना पाहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये आत्या सत्याला पाहताच त्याच्या प्रेमात पडल्याच पहायला मिळतंय. आत्याच्या येण्यामुळे मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. आता मालिकेत लव्ह ट्रँगलची गंमत पहायला मिळणार आहे. रोमँटिक सणवार मध्ये 26 एप्रिलला दुपारी 1 व रात्री 8 वाजल्यापासून ‘इन्स्पेक्टर मंजू’ व ‘जुळली गाठ गं’ या मालिकांमधून मनोरंजनाचा तडका पाहायला मिळणार आहे.
या नव्या भूमिकेबद्दल अभिनेत्री स्नेहल शिदम म्हणाली की, ” पुन्हा एकदा सन मराठीच्या सुपरहिट मालिकेत काम करण्याची संधी मिळाली याचा प्रचंड आनंद आहे. ‘इन्स्पेक्टर मंजू’ ही मालिका मी आणि माझं कुटुंब न चुकता पाहतो. त्यामुळे कुटुंबातही प्रचंड आनंद झाला आहे. मालिकेत आर्यनची आत्या ही भूमिका मी साकारत आहे. पहिल्यांदा अस मजेशीर रोमँटिक पात्र माझ्या वाट्याला आलं आहे त्यामुळे थोडी धाकधुक होते. पण सेटवर सगळे इतके भन्नाट आहेत की प्रत्येक सीन आम्ही एन्जॉय करत शूट करतो. शूटिंगच्या मधल्या वेळातही नॉन स्टॉप गप्पा, धमाल , मस्ती सुरू असते. ही भूमिका सत्या मंजूच्या आयुष्यात नवीन वळण घेऊन येणार आहे. प्रत्येक एपिसोड पाहताना प्रेक्षकांना धमाल येणार आहे. ”
अजित पवारांनंतर राष्ट्रवादी सावरण्याच्या प्रयत्नात; सुनेत्रा, पार्थ आणि जय पवार यांच्या खांद्यावर पक्षाचा भार
पुढे स्नेहल म्हणाली की, ” या मालिकेचं शूटिंग साताऱ्यात सुरू आहे त्यामुळे सातारा म्हटलं की जणू स्वर्गच. आपण जिथे शूटिंग करतो तिकडचं वातावरण भन्नाट असेल तर काम करताना देखील मज्जा येते. यासाठी मी लगेच या भूमिकेसाठी होकार दिला. नुकताच एक प्रोमो प्रेक्षकांनी पहिला. हा प्रोमो पाहून माझ्या मित्र मैत्रिणींचे मेसेज मला आले. कारण त्या प्रोमोमध्ये आत्याची एन्ट्री होताच ती सत्याच्या प्रेमात पडल्याचं दिसतयं. त्यात माझा लुक देखील वेगळा आहे. खरंच हे सगळ खूप भारी वाटत आणि मालिका पाहताना प्रेक्षकांना देखील मज्जा येईल.”