Download App

Sharad Pawar : ‘ते’ फोटो सोशल मीडियावर का वापराले? शरद पवारांची प्रफुल्ल पटेलांकडे नाराजी

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे बंडखोर खासदार प्रफुल्ल पटेल यांचा दोन दिवसांपूर्वी राज्यसभेतील आणि कॅफेटेरियामधील फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. या फोटोंवर राज्यात बरीच चर्चा झाली. बंडानंतरही पवार आणि पटेल यांच्यातील गोडवा कायम असल्याचा संदेश राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये गेला होता. (Why use photos on social media, Sharad Pawar’s displeasure with Praful Patel)

मात्र आता हा फोटो ट्विटरवर का शेअर केला? असं म्हणत शरद पवार यांनी प्रफुल पटेल यांच्याकडे नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती आहे. फोटो काढल्याच्या दुसऱ्या दिवशी संसद परिसरात भेट झाल्यानंतर शरद पवारांनी याबाबत प्रफुल पटेलांना विचारणा केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी खासदारांनी दिली आहे. त्यामुळे आता पटेल यांना पवारांच्या नाराजीला सामोरं जावं लागल्याचं दिसून येत आहे.

काय होता फोटो?

विशेष अधिवेशनादरम्यान राज्यसभेत शरद पवारांसोबत फोटो काढून प्रफुल्ल पटेल यांनी तो शेअरही केला होता. शरद पवारांसोबतचा हा क्षण खास असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. पटेल यांनी शरद पवारांसह इतरही खासदारांसमवेतचा फोटो शेअर केला होता. दुसरा फोटो हा राज्यसभेच्या चेंबरमधला होता, यामध्ये खासदार वंदना चव्हाण, शरद पवार, प्रियंका चतुर्वेदी आणि प्रफुल्ल पटेल दिसत आहेत. हा फोटो संसदेतल्या कॅफेटेरियातला आहे.

पटेल पोस्टमध्ये म्हणाले, “नवीन संसद भवनातील आजचा ऊर्जेप्रमाणं उत्साहित दिवस. राज्यसभा चेंबर खूपच आकर्षक आहे आणि हा क्षण शरद पवारांसोबत शेअर केल्यानं आणखीनच खास बनला. कॅफेटेरियात मित्रांसह स्नॅक्स आणि मैत्रीपूर्ण वातावरणाचा आस्वाद घेत आहोत. खरोखरच आजचा दिवस लक्षात ठेवण्यासारखा” असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.

तुम्हाला किंमत चुकवावी लागेल; मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी तिसऱ्यांदा नक्षलवाद्यांची धमकी

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत उभी फुट पडली. अजित पवार यांच्यासह समर्थक नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी करुन सत्तेत सहभागी झाले. विशेष म्हणजे अजित पवारांच्या गटात प्रफुल्ल पटेलांसह सुनिल तटकरेंही सामिल आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने अजित पवार गटाकडून आमचीच राष्ट्रवादी असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांचा सोबत फोटो पाहिल्यानंतर यांच्यातील गोडवा कायम असल्याचा संदेश राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये गेला होता.

Tags

follow us