CM Devendra Fadnavis on Jarange Patil movement : मनोज जरांगे पाटील हे सकाळी मुंबत आले आहेत. त्यांच आंदोलन आता सुरु झालं आहे. त्यांनी सर्व आंदोलकांना विनंती केली आहे की, कुणाला त्रास होईस असं वागू नका. (Jarange) त्यांच्या या आवानासारख आम्हीही आवाहन करतो की या विषयात चर्चेतून मार्ग निघेल. त्यामुळे जरांगे यांच्या पूर्ण मागण्याबद्दल आम्ही सकारात्मक आहोत. आता फक्त आश्वासन नाही तर कायद्याने मार्ग काढावा लागेल असं म्हणत मराठा आंदोलनाच्या जरांगे पाटील यांच्या मागणीवर काहीतरी तोडगा निघेल असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.
हा विषय न्यायालयाच्या चौकटीत
कायद्याने सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. त्यांनी आझाद मैदानात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यावर न्यायालयात निर्णय झालेला आहे. त्यामुळे हा विषय आता सरकारच्या नाही तर न्यायलयाच्या आखत्यारीत आहे. त्यामुळे त्यांना मुदतवाढ द्यायची की आणखी काही निर्यण द्यायचा हा सर्व अधिकार किंवा विषय न्यायालयाच्या कक्षेत आहे असं म्हणत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची मुदतवाढ देण्यात यावी यावर बोलतना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बचावात्मक पवित्रा घेतला.
मोठी बातमी! जरांगे समर्थकांचा मंत्रालयाला घेराव; कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास मनाई
तर तोंड भाजेल
मी सकाळपासून काही लोकांचे स्टेटमेंट पाहिले. यामध्ये अनेकजन या आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मी या लोकांना सांगतो असा काही पोळी भाजण्याचा प्रयत्न केला तर तुमचं तोंड भाजेल असा थेटच इशारा त्यांनी यावेळी दिली आहे. त्याचबरोबर हा प्रश्न पुर्णत: चर्चेने सोडवण्याचा आहे. त्यामुळे आम्हाला यात आता फक्त आश्वासन नाही तर कायद्याने मार्ग काढायचा आहे आणि दोन्ही समाज एकमेकांच्या समोर उभा राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणले आहेत.
सर्व कॅबिनेटचे अधिकार
आम्ही मराठा समाज्याच्याबद्दल जरांगे पाटील यांनी ज्या काही मागण्या केल्या आहेत त्या सर्व कायम मान्य केल्या आहेत. तसंच, कायम त्यांच्याबद्दल सकारात्मक आहोत. आजपर्यंत ज्या काही गोष्टी किंवा योजना या समाजाला देण्यात आल्या त्या फक्त आमच्याच काळात आम्ही दिल्या आहेत. त्यामुळे यावेळीही आम्ही सर्व मागण्या कशा सोडवता येतील असाच प्रयत्न करणार आहोत. तसंच, जी शिंदे समिती स्थापन केली आहे त्या समितील सर्व कॅबिनेटचे अधिकार आहेत. त्या समितीने जो निर्णय घेतला तो सरकारचा निर्णय असं समजलं जात असंही फडणवीवस यावेळी म्हणले.
शिष्टमंडळ भेटण्याची शक्यता
जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी राज्य सरकार लवकरच आपले एक शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी पाठवणार असल्याची शक्यता आहे. हा निर्णय आज म्हणजेच 29 ऑगस्ट रोजीच होण्याची शक्यता आहे. हा निर्णय झालाच तर मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्त्वात हे हे शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेऊ शकते.
जरांगे पाटील यांच्या मागण्या काय?
1. हैदराबाद गॅझेटियर लागू करा…सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावं.
2.मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे
3. ज्याची कुणबी नोंद सापडली, त्याचे सगे सोयरे घ्या, सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.
4. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.
5.मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.