Download App

Congress News : प्रदेशाध्यक्षाबाबत स्वत: नाना पटोलेंचं मोठं विधान…

पुणे : माझ्यावर हायकमांडकडून जी जबाबदारी देण्यात येईल ती जबाबदारी घेण्यास मी तयार असल्याचं मोठं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. नाना पटोलेंना एका मुलाखतीत याबाबत विचारण्यात आलं, त्यावर पटोलेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे हेच माझ काम असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

राज्यातील पाच जागांच्या विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या कोट्यात असलेली नाशिक पदवीधऱ मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. अखेरीस नाशिक पदवीधरमधून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे अपक्ष निवडून आले आहेत.

Ram Shinde: राधाकृष्ण विखेंबाबत शिंदेंचे मोठे विधान, ते आत्ताच भाजपमध्ये…

निवडणुकीत निवडून आल्यानंतर तांबे यांनी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीवर गंभीर आरोप केले होते. संपूर्ण घडमोडी घडत असताना काँग्रेसचे नेते आणि सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात उपचारासाठी रुग्णालयात दाखल होते. अखेर रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी नाना पटोले यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर ताशेरे ओढले.

सरन्यायाधीश म्हणाले “विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले असता तर…” ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको होता ?

त्यानंतर बाळासाहेब थोरातांनी विधीमंडळाच्या गटनेते पदाचा राजीनामाही पक्षाकडे दिला. मात्र काँग्रेसकडून त्यांचा हा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. त्यानंतर काँग्रेसच्या बैठकीत दोन्ही नेत्यांच्या नाराजीबद्दल विचार विनिमय होणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं.

Mrs. Chatterjee Vs Norway : मिसेस चॅटर्जी बनून राणी मुखर्जी लढणार, ट्रेलर रिलीज….

त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर आमच्यात कोणताही वाद नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली होती. त्यानंतर आता पुढील काळात हायकमांडकडून जी जबाबदारी देण्यात येईल ती जबाबदारी घेण्यास मी तयार असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.

Tags

follow us