Download App

राहुल गांधी माफी मागणार का? संजय कुमार यांच्या माफीनंतर CM फडणवीसांचा पलटवार

Devendra Fadnavis On Rahul Gandhi : काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis On Rahul Gandhi : काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections 2024) घोळ झाला असल्याचा आरोप करत निवडणूक आयोग (Election Commission) आणि भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला होता. तर आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट समोर आल्याने आता भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक संदर्भात सीएसडीएसने आकडेवारी मागे घेत माफी मागितली आहे. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत राहुल गांधी माफी मागणार का? असा प्रश्न विचारला आहे. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सीएसडीएसने जो डेटा दिला होता आणि ज्या डेटावर आधारित राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आरोप केले होते आणि आमच्याही योग्य पद्धतीने निवडून आलेल्या सरकारला आऱोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं मात्र आज सीएसडीएसने ट्वीट करुन माफी मागितली आहे. ते सगळे आकडे मागे घेतले आहेत. त्यामुळे प्रश्न एवढाच आहे की त्याच्यावर आकांडतांडव करणारे राहुल गांधी माफी मागतील का? मला मुळीच वाटत नाही. कारण राहुल गांधी हे एक प्रकारे जसे सीरियल किलर असतात तसे राहुल गांधी सीरियल लायर आहेत. त्यामुळे ते रोज खोटं बोलतील यानंतरही हीच आकडेवारी मांडतील. पण जनतेच्या समोर हे स्पष्ट झालं आहे.” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तर दुसरीकडे 7 ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतचोरी केल्याचा आरोप केला होता.

मुस्लिम मुलीच्या लग्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला धक्का

नेमकं प्रकरण काय?

राजकीय विश्लेषक आणि सीएसडीएसचे समन्वयक संजय कुमार यांनी 17 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे काही आकडे ट्विट करत मतदार याद्यांवर गंभीर प्रश्न उरस्थित केले होते मात्र आता त्यांनी याबाबत माफी मागत ट्विट डिलीट केला आहे. 2024 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीची तुलना करता चूक झाली होती. संबंधित ट्विट आता डिलीट केले आहेत. असं संजय कुमार यांनी म्हटले आहे. संजय कुमार यांच्या माफीनंतर भाजपकडून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे.

follow us