Download App

धक्कादायक! मुंबईतील भांडुपच्या ड्रीम्स मॉलमधील घटना; बेसमेंटच्या पाण्यात आढळला महिलेचा मृतदेह

मध्यंतरी ड्रीम्स मॉलमध्ये असलेल्या एका रुग्णालयाला भीषण आग लागली होती. त्यामुळे येथील रुग्णांना इतरत्र हलवण्यात आले होते.

  • Written By: Last Updated:

Bhandup Dreams Mall : मुंबई उपनगरातील भांडुप परिसरात असणाऱ्या ड्रीम्स मॉलमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. (Mumbai) या साचलेल्या पाण्यात मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसून आला. या घटनेने एकट खळबळ उडाली आहे. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, भांडुप पोलीस स्टेशन अंतर्गत ड्रीम्स मॉल बेसमेंट या ठिकाणी पाण्यात एक अनोळखी महिला वय वर्ष 30 ते 35 हिचा 09.40 चे सुमारास मृतदेह मिळून आला आहे. सदरचा मृतदेह मुलुंड जनरल हॉस्पिटल याठिकाणी भांडुप वन मोबाईलच्या मदतीने पाठवण्यात आला आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेणे चालू आहे.

सैफ अली खान हल्ला प्रकरण : आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी

भांडुप पश्चिमेला रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या ड्रीम्स मॉल गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास बंद पडलेल्या अवस्थेत आहे. या मॉलमध्ये मोजकीच दुकाने आणि कॉल सेंटर उरले होते. पावसाळ्यात या मॉलमध्ये चहुबाजूंनी पाणी शिरते. त्यामुळे बहुतांश व्यावसायिकांनी या मॉलमधून काढता पाय घेतला होता. त्यानंतर या मॉलमध्ये काही कंपन्यांची कार्यालये आणि मोजकी दुकाने उरली होती. त्यामुळे या मॉलमध्ये लोकांची फारशी ये-जा नव्हती.

मध्यंतरी ड्रीम्स मॉलमध्ये असलेल्या एका रुग्णालयाला भीषण आग लागली होती. त्यामुळे येथील रुग्णांना इतरत्र हलवण्यात आले होते. तेव्हापासून ड्रीम्स मॉलची संपूर्ण रया गेली होती. अशात या मॉलमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. ही महिला नेमकी कोण होती, ती याठिकाणी कशासाठी आली होती, तिचा मृत्यू कसा झाला, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. याबाबत आता पोलीस तपासातून काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मॉल बंद असल्यामुळे काही तरुण-तरुणी बंद मॉलच्या आत जाऊन गैरफायदा घेतात. तसेच काही समाजकंटकही आत बसलेले असतात, असे स्थानिकांकडून सांगितले जाते. स्थानिकांनी अनेकदा ड्रीम्स मॉलमधील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून त्याबाबत कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नव्हती.

follow us