Download App

शरद पवारांसमोरच महिलांचा एल्गार; म्हणाल्या, मारकडवाडीतल्या ठिणगीचा वणवा देशात पेटणार

यावेळी बोलताना एक महिला म्हणाली, आमचं मतदान व्हायचं होतं ते झालं नाही. आमच्यावर शासनाने अन्याय केला. बॅलेट पेपरवर मतदानही करू दिलं

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar in Markadwadi : माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी (Sharad Pawar) गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयाबद्दल माळशिरसचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यासह इतरही १०० हून अधिक ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला, विरोधी पक्ष ईव्हीएमविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या तयारीत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) सर्वेसर्वा शरद पवार मारकडवाडीत पोहोचले असून, त्यांनी तिथून लाँग मार्चला सुरुवात केली. मारकडवाडीत शरद पवारांनी ग्रामस्थांना संबोधन केलं. तसंच, शरद पवारांसमोरच उपस्थित महिलांनी शासनाविरोधात एल्गार पुकारला. काही महिलांनी उत्स्फूर्त भाषणं करून शासनाला कोंडीत पकडलं आहे.

यावेळी बोलताना एक महिला म्हणाली, आमचं मतदान व्हायचं होतं ते झालं नाही. आमच्यावर शासनाने अन्याय केला. बॅलेट पेपरवर मतदानही करू दिलं नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला. पोलिसांनी दमदाटी करून गुन्हा दाखल करू असं पोलीस म्हणत होते. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे असंही त्या महिला यावेळी म्हणाल्या आहेत.

लाडक्या बहिणीचा मुद्दा समोर करून…

दुसऱ्या महिलेने कवितेच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा गजर करत ईव्हीएमविरोधात न्याय मागितला. लाडक्या बहिणीचा मुद्दा समोर करून तुम्ही आमच्या अहिल्येचा अपमान करत आहात. तुम्ही स्वःच्या हिमतीवर अनेकांना जगवलं होतं, असं म्हणत सदर महिला पुढे म्हणाली, मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीच्या देशभर पेटला पाहिजे. फक्त महिलाच नव्हे तर शाळकरी मुलीनेही ईव्हीएमविरोधात एल्गार पुकारला आहे.

follow us