World Women’s Day च्या दिवशी यशोमती ठाकूरांना विधानसभेत अश्रू अनावर!

मुंबई : जागतिक महिला दिनाच्या (World Women’s Day) दिवशी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात आमदार (MLA) यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) भावुक झाल्या. त्याला कारण तसेच होते. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, माझ्या पतीचे निधन होऊन आज १८ वर्षे झाली. मात्र, आजही माझ्या मुलांच्या नावाने त्यांची हक्काची संपत्ती झाली नाही. महिला धोरण आणि त्या कायद्याची अंमलबजावणी प्रभाविपणे केली जात […]

Yashomathi Thakur

Yashomathi Thakur

मुंबई : जागतिक महिला दिनाच्या (World Women’s Day) दिवशी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात आमदार (MLA) यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) भावुक झाल्या. त्याला कारण तसेच होते. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, माझ्या पतीचे निधन होऊन आज १८ वर्षे झाली. मात्र, आजही माझ्या मुलांच्या नावाने त्यांची हक्काची संपत्ती झाली नाही. महिला धोरण आणि त्या कायद्याची अंमलबजावणी प्रभाविपणे केली जात नसल्याचे सांगत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या की, नुसताच जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. पण महिलांना आजही संघर्ष करावाच लागत आहे.

Pawar Vs Vikhe : फडणवीसांनी डाव टाकला अन् पवारांचा ‘काटा’ काढला!

राज्याच्या अर्थ संकल्पिय अधिवेशनात जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या कामकाज पत्रिकेत सर्वपक्षीय महिला आमदारांच्या लक्षवेधी सूचना चर्चेला ठेवल्या होत्या. राज्य सरकारचे १९९४, २००२, २०१४, २०१९ चे प्रस्तावित धोरण तसेच २००१ चे राष्ट्रीय महिला धोरण यांचं एकत्रिकरण करून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक महिला धोरण तयार करण्याबाबत सरकारी पातळीवर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने ठराव मांडण्यात येत आहे.

याप्रसंगी लक्षवेधीवर बोलण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी सुरुवातीलाच महिला धोरणाबाबत सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. महिला धोरण आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातली तफावत सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.

Exit mobile version