Download App

जमशेदजी टाटांना यशवंतराव चव्हाणांची विनंती; शरद पवारांनी सांगितला पिंपरी चिंवडच्या उद्योगाचा किस्सा

पिंपरी चिंचवड येथे विजयी संकल्प मेळ्याव्यात बोलताना शरद पवारांनी काही जुन्या आठवणी सांगितल्या. उद्योग कसे उभे राहिले हे सांगितलं.

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar : उद्योग व्यवसाय मुंबईत होते. त्यावेळी ते काही बाहेर घेऊन जावेत अशी यशवंतराव चव्हाणांची होती. त्याचवेळी जमशेदपूर येथे टाटा कारखाना असताना एक ऑटो कारखाना काढण्याचा विचार जमशेदजी टाटा करत होते. (Sharad Pawar) त्याचवेळी यशवंतराव चव्हाणांनी जमशेतजी टाटा यांना विनंती केली की तुम्ही जमशेदपूर नाही तर पुण्याला कारखाना काढा अशी विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. आणि पहिला ऑटो मोबाईलाच पहिला कारखाना इथ आला अशी आठवण शरद पवारांनी यावेळी सांगितला. ते पिंपरी चिंचवड येथे विजयी संकल्प कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, त्यांनी पिंपची चिंचवड येथे कसे उद्योग व्यवसाय आले याचा इतिहासच मांडला.

दुसरी विनंती रोहित पवारांनी या तीन मतदारसंघावर ठोकला दावा, थेट शरद पवार अन् जयंत पाटलांकडं केली मागणी

यशवंतराव चव्हाणांनी दुसरी विनंती केली कमलनयन बजाज यांना. ऑटो मोबाईलमध्ये ज्यांना जायचं होत त्यांना यशवतंराव चव्हाणांनी विनंती केली. त्यानंतर आज बजाज ऑटोसह अनेक छोटो मोठे व्यवसाय उभा राहिले असं ही पवार यावेळी म्हणाले. टाटा उद्योगसमूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांची आठवण काढत शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड कसे उद्योग व्यवसाय आले याचा इतिहासच वाचला. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी विनंती केल्यानंतर जमशेदजी टाटा यांनी दुसऱ्या राज्यात जात असलेला उद्योग महाराष्ट्रात म्हणजे पिंपरी चिंचवडला आणला अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

रोहित पवार काय म्हणाले चहा, जेवण उशीरा मिळते; मनोरमा खेडकरांच्या तक्रारीनंतर कोठडीतील फुटेज कोर्टाने मागितले

आमचा कार्यक्रम सुरु होताना अनेक लोकांना या कार्यक्रमाला यायचं होतं. परंतु, येथे काही पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना आतमध्ये येऊ दिलं नाही. ही काही सत्ताधाऱ्यांची सभा नाही. शरद पवारांवर प्रेम असणारे हे सगळे आमचे कार्यकर्ते आहेत. परंतु, लक्षात ठेवा फक्त तीन-ते चार महिन्यांचा कालावधी राहीलाय. त्यानंतर आमची सत्ता येणार आहे. आज जर असं वागत असतील तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही असा थेट इशाराच रोहित पवारांनी यावेळी पोलिसांना दिला आहे.

 

follow us