देशात सध्या तरी शरद पवारांसारखा दुसरा अनुभवी नेता नाही, त्यामुळे 2024 नंतर पवार देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, असं भाकीत ज्येष्ठ नेते, साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी केलं आहे. दरम्यान, आज गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गडाख यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गडाख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
यशस्वी जायसवालने झळकावले IPL इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक
गडाख म्हणाले, ऐंशी पार केल्यानंतरही शरद पवार राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत. शरद पवारांची कारकीर्द संघर्षमय असून त्यांनी कधीही हार मानली नाही. आजारपण किंवा वयाचे कारण देऊन ते थांबले नाहीत. या वयातही ते लोकांमध्ये जातात. या वयात अशी हिंमत दाखविणारा कदाचित ते शेवटचा नेता ठरणार असल्याचंह म्हणत पवारांविषयी गौरवोद्गार काढले आहेत.
हाच विचार करता परिस्थिती बदलली तर २०२४ नंतर ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. आतापर्यंत त्यांना हे पद मिळाले नाही, याला कारण दिल्लीतील काँग्रेसमधील चौकडी आहे. त्यांच्याकडून पवारांबद्दल श्रेष्ठींचे काम भरले जातं. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडत असे. आम्ही मात्र त्यांच्या कायम पाठीशी राहिलो. नरसिंहराव यांच्यावेळीही आमची पसंती पवारांनाच होती, असं गडाख यांनी स्पष्ट केलं आहे.
Video : ‘भाजपला नैतिकतेची शिकवणी पवार साहेबांसाठी कठीणच’.. फडणवीसांचा खोचक टोला
शिवसेना फुटीच्यावेळी आमदार शंकर गडाख ठाकरे यांच्यासोबतच राहिले. याची जाण ठेवत आज उध्दव ठाकरे स्वत: सोनईत येऊन यशवंतराव गडाख यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्यावेळी ठाकरेंनी पाठिंब्याबद्दल विचारणा करताच आम्ही तुमच्यासोबतच आहोत, असा शब्द मी त्यांना दिला होता, त्यामुळे त्यांनी ज्येष्ठ मंडळींना डावलत शंकर गडाख यांना मंत्रिपद दिलं होतं. बंडावेळी आम्हालाही प्रलोभने आली, पण आम्ही उद्धव ठाकरेंची साथ सोडली नसल्याचं गडाख यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, माझी खासदारकी सहा वर्षे अपात्रही ठरविली होती. पण मी धीराने सामोरे गेलो. तसेच आता उद्धव ठाकरेही अडचणीला धीराने सामोरे जात आहे. कधी ना कधी त्यांना यश मिळेलचं, असा विश्वास त्यांना यावेळी व्यक्त केला आहे.