Download App

Congress : अहमदनगरमध्ये कॉंग्रेसला धक्का, ‘या’ नेत्याने दिली सोडचिठ्ठी

Congress Leader Resign : कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत वाद नेहमीच समोर आल्याचं आपण पाहिलं आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात इतर नेते हे उदाहरण राज्यातील कॉंग्रेसमध्ये ताज असताना, आता अहमदनगरमध्ये कॉंग्रेसला धक्का बसला आहे. युवक काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. यामागील कारण देखील पक्षातील अंतर्गत वाद हेच आहे. (Youth Congress City President Resign in Ahmednagar )

News Arena India Survey : पाटील विरुद्ध महाडिक टफ फाईट होणार? कोल्हापूर दक्षिणमध्ये 50:50 चा अंदाज

किरण काळे अहमदनगर शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत. पण त्यांच्या कारभाराला आणि भूमिकेला कंटाळून ब्लॉक युवक काँग्रेस शहर अध्यक्ष व क्रीडा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील यांनी पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी गीते यांनी आरोप केले आहेत की, काळे हे स्वस्वार्थाच्या सोयीस्कर व आडमुठे धोरणाचे राजकारण करत आहेत. त्यामुळे मी त्यांच्या राजकीय भूमिका तसेच व्यक्ती द्वेष कार्यपद्धतीला कंटाळून पदाचा राजीनामा दिला आहे.

ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है…; लंकेंचा विखेंना थेट इशारा

प्रवीण गीते यांनी काँग्रेसमध्ये काम करून काळे यांची राजकीय ताकद शहरात वाढवण्यासाठी युवकांचा व क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचे मोठ्या प्रमाणात संघटन तयार केले होते. या अगोदर देखील काँग्रेस पक्षामध्ये किरण काळे यांची गटबाजी, अडमुठे राजकीय धोरण, व्यक्तीद्वेष यामुळे अनेक ज्येष्ठांनी राजीनामे दिलेले आहेत. त्यामुळे शहरात कॉंग्रेसला फटका देखील बसल्याचे पाहायला मिळालेलं आहे.

त्यानंतर आता युवक काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद आणि पक्षाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात काँग्रेसला फटका बसणार असल्याचे सांगितले. त्यांच्या राजीनामामुळे शहरांमध्ये राजकीय वातावरण बदलण्याचे संकेत दिसत असून राजीनाम्याचे पत्र त्यांनी शहर अध्यक्ष व वरिष्ठांना दिले आहे.

Tags

follow us