ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है…; लंकेंचा विखेंना थेट इशारा

ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है…; लंकेंचा विखेंना थेट इशारा

Nilesh Lanke Speak On Radhkrishna Vikhe Patil : राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या राहात्यामधील गणेश सहकारी कारखाना निवडणुकीचे (Ganesh Sugar factory election) निकाल समोर आले आहेत. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) व राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. या निवडणुकीत विखेंना धक्का देत थोरात कोल्हे गटाने मुसंडी मारली आहे. या निकालावरुन पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांना टोला लगावला आहे. “ये तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है” असे म्हणत आमदार लंकेंनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पराभवावर भाष्य केले आहे. (Nilesh Lanke Speak On Radhkrishna Vikhe Patil Ganesh Sugar factory election)

विखेंना धक्का! गणेश कारखाना थोरात-कोल्हेंनी हिसकावला…

राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी सुरु आहे. त्यात सहकारात कधीच दुसर्‍याच्या तालुक्यात जाऊन हस्तक्षेप न करणारे आमदार बाळासाहेब थोरात यांनी थेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या मतदारसंघात एंन्ट्री केली. एवढेच नाही तर थोरात यांनी तेथे स्वत:चा पॅनल देखील उभा केला. थोरात यांना या निवडणुकीत कोल्हे गटाची साथ मिळाली.

News Area India Survey : श्रीकांत शिंदेंची फिल्डिंग फेल जाणार? प्रणिती शिंदे चौथ्यांदा गाठणार विधानसभा

थोरात-कोल्हे गटापुढे विखेंनी बाजू कमकुवत ठरली. या निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला तर विखे यांच्या विरोधातील बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांच्या परिवर्तन पॅनलने घवघवीत यश मिळवलं आहे. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आमदार लंके यांनी थेट राहाता गाठले त्यांनी सर्व सभासद मतदारांचे आभार मानले.

विखेंवर हल्लाबोल करत लंके म्हणाले की, मतदारांनीं खऱ्या अर्थाने सत्याच्या बाजूने कौल दिला आहे. मी सर्व मतदारांचे आभार मानतो. खऱ्या अर्थाने दहशतवादाला राहत्यातील जनतेनेच मूठमाती दिली आहे. दहशतीचे झाकणच उडून गेले आहे.

सत्तेचा गैरवापर यांनी केला मात्र मतदारांनी निवडणुकीच्या निकालातून त्यांना उत्तर दिले आहे. ये तो सिर्फ झांकी है पिक्चर अभी बाकी है, असं म्हणत त्यांनी सर्व सभासदांचे आभार मानले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube