Download App

Yuva Sangharsh Yatra : युवा संघर्ष यात्रेला गालबोट; नागपुरात राडा, रोहित पवारांसह कार्यकर्ते ताब्यात

Mla Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यांच्या युवा संघर्ष यात्रेला गालबोट लागलं आहे. उपराजधानी नागपुरात आज युवा संघर्ष यात्रेचा समारोप झाला. या समारोपाला महाविकास आघाडीचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमातून संजय राऊतांसह इतर नेत्यांनी सरकारवर चांगलीच तोफ डागली. त्यानंतर ही संघर्ष यात्रेतील कार्यकर्ते थेट विधानभवनाकडे निघाल्याने मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पोलिसांनी रोखलं मात्र, पोलिसांनाही कार्यकर्त्यांना न जुमानल्याचं पाहायला मिळालं आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांसह रोहित पवार यांनाही ताब्यात घेतलं आहे.

Paplet पकडण्यावर सरसकट बंदी नाहीच, पापलेटला मिळणार जीआय मानांकन; मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं

युवा संघर्ष यात्रेच्या समारोपानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट विधानभवनावर धडक घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडून पुढे आल्याचं दिसून आलं आहे. याचदरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

Ahmednagar : नगर शहरात फ्लॅटला भीषण आग; एक जण जखमी

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेच्या सांगता समारंभानंतर मोठा राडा झाला. रोहित पवार यांनी राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या. या मागण्या स्वीकारण्यासाठी राज्य सरकारचे जबाबदार व्यक्ती हजर नसल्याने, रोहित पवार आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं आहे.

Weather Update : ऐन थंडीत पाऊसधारा! आज ‘या’ भागात पाऊस लावणार हजेरी

निवदेन स्विकारायला कोणीच नाही :
युवा संघर्ष यात्रेच्या समारोपानंतर राज्यातील विविध मागण्यांचं निवेदन आमदार रोहित पवार देण्यासाठी विधी मंडळाकडे आले. त्याचवेळी निवेदन स्विकारण्यासाठी कोणीच उपस्थित नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

कॅरमेल रॅप शर्टपासून लाइम ग्रीन जॅकेटपर्यंत साकिब सलीमचे स्टायलिश आउटफिट्स… पाहा फोटो…

जर सरकारकडून कोणी जबाबदार व्यक्ती निवेदन स्वीकारण्यास येणार नसेल तर आम्ही विधानभवनात जाऊन निवेदन देणार आहोत.तसेच शेतकरी,तरुणांविषयीचे काही मागण्या आमच्या आहेत. या मागण्यांचे निवेदन घेण्यास एकही सरकारच्या प्रतिनिधी आमच्याकडे आला नाही. असा आरोप करत आमदार पवार आक्रमक झाले आहे.

Tags

follow us