Ahmednagar : नगर शहरात फ्लॅटला भीषण आग; एक जण जखमी

Ahmednagar : नगर शहरात फ्लॅटला भीषण आग; एक जण जखमी

Ahmednagar News : शहरातील धर्माधिकारी मळा येथील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटला शॉर्ट (Ahmednagar News) सर्किटमुळे भीषण आग लागली. हा फ्लॅट दिवंगत प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचा असल्याची माहिती मिळाली आहे. या ठिकाणी अनेक जण अडकले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. हा फ्लॅट सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांच्या नावावर असून येथे भाडेकरू राहत आहेत.

Ahmednagar : पिण्याच्या पाण्यासाठी महिला आक्रमक! पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन..

या घटनेत फ्लॅटमधील भाडेकरू किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपार्टमेंटमधील तळमजल्याला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे दल घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकही त्यांच्या मदतीला आले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप खरे कारण समोर आलेले नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube