ZP Election 2026 : लवकरच जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा, ‘या’ दिवशी होणार मतदान ?

ZP Election 2026 : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने बंडखोरांच्या भूमिकेक

ZP Election 2026

ZP Election 2026

ZP Election 2026 : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने बंडखोरांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी मतदान तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे आता राज्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य निवडणूक आयोग लवकरच जिल्हा परिषदांच्या (Zilla Parishad) निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार (Supreme Court) , राज्य निवडणूक आयोगाला (Maharashtra Election Commission) राज्यात 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची तयारी करत आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 6 आणि 7 जानेवारी रोजी महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी आवश्यक ईव्हीएम (EVM) मशीन उपलब्ध आहे मात्र महापालिका निवडणुकीच्या कामात मनुष्यबळ असल्याने 16 जानेवारीनंतर जिल्हा परिषदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. 6 आणि 7 जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत मतदानाच्या (ZP Election 2026) अंतिम तारखांवर निर्णय होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या या बैठकीत जिल्हा परिषदांचे संबंधित अधिकारी तसेच पोलीस अधिकारी देखील उपस्थित राहणार आहे.

या दिवशी होणार मतदान

आरक्षणामुळे राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे तर ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50 टक्के पेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी निवडणुका स्थगित ठेण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. तर जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी 25 जानेवारी किंवा 28 जानेवारी रोजी मतदान होण्याची शक्यता आहे आणि निकाल 26 जानेवारी किंवा 29 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येऊ शकते.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला मोठा धक्का, स्टार खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा; इंग्लंडविरुद्ध खेळणार शेवटचा सामना

तर दुसरीकडे राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील मुख्य राजकीय पक्ष बहुतेक ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Exit mobile version