Download App

मोठी बातमी! जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर…कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?

राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलंय. पुणे सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद जाहीर करण्यात आलंय.

ZP President Reservation : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलंय. पुणे सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद जाहीर करण्यात आलंय. तर अहिल्याननगरमध्ये अनुसूचित जमाती (महिला) साठी जाहीर करण्यात आलंय.

कर्ज नाही भरलं तर फोन होईल लॉक; आरबीआयचा नवीन नियम…

देशातील सर्व राज्यांच्या केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची परिषद भारत निवडणूक आयोगाने आयोजित केली. ही परिषद इंडिया इंटरनॅशनल फॉर डेमॉक्रसी अॅंड इलेक्टोरल मॅनेजमेंटमध्ये घेण्यात आलीयं. या बैठकीत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील मतदारसंख्या, मतदार यादीची संपूर्ण माहिती सादर केलीयं. तर SIR नंतर झालेल्या मतदार याद्यांचे डिजिटलायझेसन वेबसाईटवर अपलोड स्थितीही मांडण्यात आलीयं.

Ahilyanagar Railway Station : आता रेल्वे स्थानकाचे नावही ‘अहिल्यानगर’…

राज्यातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर…

लातूर – सर्वसाधारण (महिला)
अमरावती – सर्वसाधारण (महिला)
अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
परभणी – अनुसूचित जाती
वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणा -सर्वसाधारण
यवतमाळ सर्वसाधारण
नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
वर्धा- अनुसूचित जाती
भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)
सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
नाशिक -सर्वसाधारण
धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नंदूरबार-अनुसूचित जमाती
जळगांव – सर्वसाधारण
अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
पुणे -सर्वसाधारण
सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
ठाणे -सर्वसाधारण (महिला)
पालघर – अनुसुसूचित जमाती
रायगड- सर्वसाधारण
रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली – सर्वसाधारण (महिला)
सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
बीड – अनुसूचित जाती (महिला)
हिंगोली -अनुसूचित जाती
नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

follow us