कर्ज नाही भरलं तर फोन होईल लॉक; आरबीआयचा नवीन नियम…

कर्जदाराने कर्ज न भरल्यास फोन लॉक करण्याबाबची योजना रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून आखण्यात येत आहे.,

RBI

Reserve Bank Of India : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) कर्जदात्यांची ताकद वाढवण्यासाठी नवीन नियम आणलायं. जे कर्जदार कर्ज भरण्यास असमर्थ असतील त्यांचे फोन लॉक करणार असल्याचा नवा नियम आरबीआयकडून लागू करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या नियमामुळे कर्ज देणाऱ्यांना दिलासा मिळणार असून कर्जदारांच्या अडचणी वाढणार आहेत.

मोठी बातमी! फिजियोथेरपिस्टना स्वतःला डॉक्टर म्हणण्याचा अधिकार नाही; DGHS च्या पत्रातून खुलासा

2024 च्या होम क्रेडिट अहवालानुसार एक तृतीयांशी कर्जदारांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कर्जाने खरेदी केल्या आहेत. मागील वर्षी आरबीआयने कर्जदारांचे फोन लॉक करण्यापासून रोखण्यासाठी सांगितलं होतं. लॉक करण्यासाठी कर्जदारांच्या फोनमध्ये एक अॅप इन्स्टॉल केले जाणार आहे. कर्जदारांसोबत चर्चा केल्यानंतर आरबीआय पुढील काही दिवसांतच फोन लॉकिंगचे निर्देश देणार आहे.

आता व्हॉट्सअपवर सरकारी सेवा अन् योजनांचं काम; लेटेस्ट व्हर्जनचं फडणवीसांकडून सूतोवाच

कर्जदाराचा फोन लॉक केल्यानंतर कर्जदार पैसे भरु शकतो. एवढंच नाही तर कर्जदाराची माहिती सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. हा नियम लागू झाल्यास बजाज फायनांन्स डीएआई फायनान्स , चोलामंडलम यांना अधिक लाभ होणार आहे. या नियमामुळे कंपन्यांच्या रिकव्हरीमध्ये वाढ होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube