Download App

दारूच्या नशेत गाडी चालवताना पोलिसांना सापडला, कारवाईच्या भितीने जीवन संपविले

Thane Crime : ठाणे शहरात 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दारूच्या नशेत गाडी चालवताना पकडल्यापासून हा तरुण अस्वस्थ होता. पोलिसांनी सांगितले की, आत्महत्या करण्यापूर्वी मनीष उतेकर नावाच्या तरुणाने सोशल मीडियावर एक सुसाइड नोट शेअर केली होती.

या नोटमध्ये त्याने वाहतूक पोलिसांवर छळवणूक केल्याचा आरोप केला होता. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. शहरातील वागळे इस्टेट परिसरात राहणाऱ्या उतेकर याने शुक्रवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली होती. भविष्य उद्ध्वस्त होईल या भितीने तो अस्वस्थ होता. पोलिसांनी आपल्याशी नरमाईने वागले पाहिजे अशी त्याची इच्छा होती. तो काही वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.

मुंबईतील चाबड हाऊसला आंतकवादी हल्ल्याचा धोका? दहशतवाद्याकडे सापडले फोटो

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उतेकर याने सुसाईड नोटमध्ये शहरातील कोपरी वाहतूक पोलिस कर्मचारी – “पुष्पक आणि सुधाकर” यांच्यावर आरोप केला आहे. परंतु पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड म्हणाले, कोपरी युनिटमध्ये पुष्पक आणि सुधाकर नावाचे कर्मचारी नाहीत. याप्रकरणी श्रीनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Tags

follow us