विरार : विरारच्या नारंगी फाटा परिसरात असलेल्या रमाईबाई अपार्टमेंट Ramabai Apartment) या चार मजली इमारतीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये एका वर्षाच्या चिमुकलीचाही समावेश आहे. तर वसईचे आमदार स्नेहा दुबे-पंडीत (Sneha Dubey-Pandit) यांच्या म्हणण्यानुसार इमारतीत 20 ते 25 जण अद्याप अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कमळ हाती घेताच संग्राम थोपटेंना ‘अच्छे दिन’, अडचणीत असलेल्या साखर कारखान्याला 409 कोटींचे कर्ज मंजूर
मिळालेल्या माहितीनुसार, दहा वर्षापूर्वीची इमारत असून महापालिकेने अतिधोकादायक इमारत घोषित केली होती. पालिकेकडून अनेकदा यासंदर्भातील नोटीस देखील देण्यात आल्या होत्या. तरीही नागरिक या इमारतीमध्ये राहत होते. रात्री साडे अकरा वाजता अचानक इमारतीच्या चौथ्या मजल्याचा काही भाग कोसळला. यात दुर्घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, या इमारतीत, जोयल कुटुंबातील एका चिमुरडीचा पहिला वाढदिवस होता. त्यानिमित्ताने तिचा मित्रपरिवार आला होता. मात्र, ज्या मुलीचा वाढदिवस होता तिचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या आईचाही अपघातात मृत्यू झाला. वडील ओंकार जोयल सध्या मिसिंग आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणारे सचिन निवाळकर (वय ४४), त्यांची पत्नी सुप्रीला निवाळकर (वय ४०) आणि मुलगा अर्णब निवाळकर (वय १४) हे सर्व मिसिंग असल्याची माहिती आहे.
जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम, आज सकाळी 10 वाजता मराठा बांधव अंतरवली सराटीहून निघणार
दरम्यान, एनडीआरएफ टीम आणि वसई-विरार शहर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी रेक्सूचे काम करत आहे. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आतापर्यंत ९ जणांना रेस्क्यू करून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.
वसई-विरार महानगरपालिकेने इमारतीच्या बांधकामाची चौकशी सुरू केली असून इतर धोकादायक इमारतींची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. इमारतीची अवस्था खराब होती, पण प्रशासनाने वेळीच कारवाई केली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया एका रहिवाशाने दिली.