Download App

सावधान! गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, कोरोना रुग्णांची संख्या वाढली

  • Written By: Last Updated:

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे संसर्ग वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज दिवसभरात 483 नव्या रुग्णांची भर पडली आहे. 317 रुग्ण बरेही झाले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं ही महिती दिली आहे. सरकारनं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात 483 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून 317 रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्यानं ते बरे झाले आहेत. तर दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर हा 98.15 टक्क्यांवर आहे. तर मृत्यूचा दर 1.82 टक्के आहे.

भारतात वर्ल्ड कपचे सामने खेळण्यास पाकिस्तानचा नकार, ICC घेणार मोठा निर्णय

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या चार महिन्यांमध्ये कमी झाली होती. पण गेल्या काही आठवड्यामध्ये कोरोना रुग्णांचा आलेख दिवसागणिक वाढत आसल्याचं चित्र आहे. वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी मास्क वापरण्याचं आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. सॅनिटायझरने हात स्वच्छ ठेवा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असे अवाहन देखील आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

Tags

follow us