भारतात वर्ल्ड कपचे सामने खेळण्यास पाकिस्तानचा नकार, ICC घेणार मोठा निर्णय

भारतात वर्ल्ड कपचे सामने खेळण्यास पाकिस्तानचा नकार, ICC घेणार मोठा निर्णय

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील बिघडलेल्या राजकीय वातावरणाचा फटका क्रिकेटला बसत आहे. आशिया चषकाबाबत (Asia Cup 2023) दोन्ही देशांमध्ये आधीच वाद सुरू आहे आणि आता 50 षटकांच्या विश्वचषकाबाबत (World Cup 2023) आलेल्या बातम्यांमुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली आहे.

पाकिस्तान संघ या वर्षाच्या अखेरीस होणार्‍या वनडे विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येणार नाही. भारताऐवजी बांगलादेश या दोन्ही देशांमधील सामन्यांचे यजमानपद भूषवणार आहे. एवढेच नाही तर भारत आणि पाकिस्तानचे संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरले तर विजेतेपदाचा सामनाही भारतात होणार नाही.

Dilip Sopal यांनी जागवल्या बापटांच्या आठवणी : स्पोर्ट शूज घालून झोपणारा मित्र गेला…

आयसीसी अजूनही या योजनेवर विचार करत आहे. या योजनेवर सहमती झाली तर 2023 च्या विश्वचषकासोबतच आशिया चषकही अशाच पद्धतीने आयोजित करता येईल. विशेष म्हणजे BCCI सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले होते की, भारतीय संघ आशिया कप 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही.

शाह यांचे हे विधान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पटले नाही आणि त्यांनी सांगितले की जर टीम इंडिया आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात आली नाही तर तो 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतात जाणार नाही. आशिया कप 2023 चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. विश्वचषकापूर्वी आशिया कप आयोजित केले जाणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube