Download App

काळाचा घाला, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात, 11 जणांचा जागीच मृत्यू

  • Written By: Last Updated:

A bus fell into a deep ravine on the old Mumbai-Pune highway : जुन्या पुणे-मुंबई हायवेवर (Pune-Mumbai Highway) एक खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात (accident) झाला आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस दरीत कोसळल्याने 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 20 ते 30 जण हे गंभीर जखमी झाले आहेत. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ (Near Shingroba Temple) पहाटे चार वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही खासजी बस पुण्याहून मुंबईकडे निघाली होती. पहाटे चार वाजताच्या सुमारास बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. चालकाचा ताबा सुटल्याने पुणे-मुंबई हायवेवर असलेल्या शिंगरोबा मंदिराच्या घाटात हा अपघात झाला. बस दरीत कोसळल्याने प्रवाशांची आरडाओरड सुरु झाली. रात्रीची वेळ असल्याने अनेक प्रवासी गाढ झोपेत होते.

ज्यांना कोणी नडत नाही, त्यांना निलेश लंके नडतो; लंकेंचा विखे पिता-पुत्रांना इशारा

अचानक बस आदळल्याने या प्रवाशांना जाग आली. बस आदळल्याने अनेकांना मार लागला आहे. बस दरीत कोसळताच वाचवा वाचवा अशी ओरड प्रवाशांनी केली. त्यांचा ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकून आजपासचे ग्रामस्थ दरीच्या दिशेने धावले. त्यानंतर या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते. मात्र, अंधार असल्याने बचाव कार्यात मोठी अडचण येत होती.

या अपघाताची माहिती मिळताच, पोलीस प्रशासन आणि अग्निशम दलाचे जवान, हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या सर्वांनी रेस्क्यू ऑपरेशन युध्दपातळीवर हाती घेतलं. या अपघातात आतापर्यंत दहा जण ठार झाल्याचं सांगितल्या जात आहे. बसमध्ये 40 ते 45 प्रवाशी होते. त्यापैकी, 20 ते 30 प्रवाशी गंभीर जखमी झाली आहे. या सर्व जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर आणखी काही प्रवाशी बसमध्ये अडकले आहेत. त्यांना बचाव पथकांकडून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. या खासजी बसमध्ये बाजी प्रभु वादग गट (झांज पथक) गोरेगाव (मुंबई) येथील असून पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात असल्याचे पोलिसांनी सांगितलं.

 

Tags

follow us