ज्यांना कोणी नडत नाही, त्यांना निलेश लंके नडतो; लंकेंचा विखे पिता-पुत्रांना इशारा

ज्यांना कोणी नडत नाही, त्यांना निलेश लंके नडतो; लंकेंचा विखे पिता-पुत्रांना इशारा

Nilesh Lanke on Radhakrishna Vikhe : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात सुरुवातीपासून विखे गटाचा दबदबा राहिला आहे. या गटाला वेसण घालण्याचं काम शरद पवारांकडून (Sharad Pawar) सातत्याने होत असते. त्यासाठी आमदार निलेश लंकेना (Nilesh Lanke) बळ दिले जात आहे. त्यामुळं आता नगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) आणि निलेश लंके यांच्यात छुपा संघर्ष असल्याचं दिसत आहे. आताही एका कार्यक्रमात बोलतांना लंकेंनी विखे नाव न घेता पिता-पुत्रांवर जोरदार टीका केली आहे. 2022 ला माझी ईडीकडून चौकशी झाली, पण ईडीची धमकी देण्याचं काम त्यांचं नाही, ते एवढं सोप्पं आहे का? ज्यांना कोणी नडत नाही, त्यांना निलेश लंके नडतो, असा इशाराही त्यांनी दिला.

अमहनगरला महाविकास आघाडीचा बाजार समितीच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी निलेश बोलत होते. तेव्हा लंकेंनी नाव न घेता विरोधकांवर तुफान राजकीय फटकेबाजी केली. लंके म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी घेऊन, त्यांचा गैरवापर केला जात आहे. 2022 साली माझीही ईडीची चौकशी झाली होती, असा गौप्यस्पोट करून त्यांनी नाव न घेता विखेंवर टीकास्त्र डागलं. 2022 ला माझी ईडीकडून चौकशी झाली, पण ईडीची धमकी देण्याचं काम त्यांचं नाही, ते एवढं सोप्पं आहे का? संघर्ष आपल्या पाचवीला पुजलेला आहे. ज्यांना कोणी नडत नाही, त्यांना निलेश लंके नडतो. हा इतिहास जिल्ह्यात सर्वांना माहित आहे, असं त्यांनी सांगितलं.

नारायण राणेंनी सांगितला बाळासाहेबांचा ‘तो’ किस्सा; बाळासाहेबांच्या आठवणीत राणे भावूक

मला ईडीचा फोन आला, ईडीची चौकशी झाली, तेव्हा ईडीवाले वैतागून गेले होते. त्यांना माझ्याकडे काहीच सापडले नाही. ते म्हणाले, या निलेश लंकेकडे काहीच निघत नाही. त्यावेळी मी मनात म्हटलं की, उलट ईडीवालेच म्हणतील हे खिशातले पैसे खर्चालया घे. ईडीवाले आले अन् नुसते येडे होऊन गेले, असा टोलाही त्यांनी लगावला. हा फक्त सत्तेचा गैरवापर चालू आहे. पण, लक्षात ठेवा आम्ही देखील अडीच वर्ष सत्तेत होतो. मात्र, सत्तेचा दुरुपयोग कधी केला नाही. सर्वसामान्य माणसांना कसा फायदा होईल, याचा प्रयत्न केला, असं लंके म्हणाले. पण, इथं सत्तेचा फार गैरवापर होत आहे. सरकारी अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं जातं, की त्याचं क्रेशल सेल करा. अधिकाऱ्यांना विचारलं असता, ते सांगताहेत की, साहेब आमच्यावर दबाव आहे, मी तरी काय करू? असं लंकेंनी सांगितलं.

लंके म्हणाले की, लोक लंकेवर विश्वास ठेवतात. कारण काय, तर लोकांना ठाऊक आहे की, हा माणूस जर एखाद्याच्या विरोधात गेला, तर त्याचा शेवटच करतो. महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर काही सरकारी अधिकारी येड्यासारखं करायला लागले होते, मात्र, त्यांना सांगितलं की, मला काय मागचा निलेश लंके व्हायला लावू नका. आम्ही सुसंस्कृत राजकारणी आहोत. मात्र, आम्ही जशास तसे वागतो. आमची हात जोडायची तयारी आहे, पाया देखील पडायची तयारी आहे. तसंच वेळेप्रसंगी बाह्या वर करायची ताकतपण आहे. तुम्ही वाकडा पाय टाकला तर आम्ही दोन पावलं वाकडे टाकणार, असं दमही लंकेनी दिला.

लंके म्हणाले की, आज विखे आमच्या कामाचं श्रेय घेत आहेत. हे काय चार वर्ष काय झोपले होते का? माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना की, त्यांनी विकासासाठी किती निधी आणला? मी किती निधी आणला? याचा एकदा हिशोब करू… होऊन जाऊ द्या… झेंडा आमचा दांडा आमचा, यामुळं पंढरपुरला आम्हीच जाणार आहोत, अशा शब्दात विखेंची खिल्ली उडवली.

दरम्यान, ही गर्दी सांगतो की, तीस तारखेला निकाला आपलाच आहे. गुलाल आपलाच आहे. आमची यंत्रणा रात्री बारा वाजता चालू होते. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी अस डॉयलॉग मारत चांगलीच वाहवा मिळवली. उद्या मार्केट कमिटी आल्यानंतर सर्वांना नाश्ता फुकट देणार असल्याची घोषणाही लंकेंनी केली.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube