Mohit Kamboj : ‘आईचे दूध प्यायला असेल तर…’ भास्कर जाधवांना पुन्हा डिवचले

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यातील वाद चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत. भास्कर जाधव यांनी गुवाहाटीचं (Guwahati) तिकिट बुक केलं होतं, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 100 वेळा फोन केला होता, असा गौप्यस्फोट मोहित कंबोज यांनी केला होता. या वक्तव्यानंतर १०० बापांची पैदास असेल तर […]

Untitled Design (4)

Untitled Design (4)

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यातील वाद चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत. भास्कर जाधव यांनी गुवाहाटीचं (Guwahati) तिकिट बुक केलं होतं, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 100 वेळा फोन केला होता, असा गौप्यस्फोट मोहित कंबोज यांनी केला होता.

या वक्तव्यानंतर १०० बापांची पैदास असेल तर आरोप सिद्ध करा, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली होती. यावर मोहित कंबोज यांनी आणखी एक ट्विट करत भास्कर जाधव यांच्यावर टीका केली आहे, ज्यामुळे भास्कर जाधव आणि मोहित कंबोज यांच्यामधील वाद पेटला आहे.

ठाकरे गटाच्या उपनेत्यांनी घेतला पदाधिकाऱ्यांचा समाचार; म्हणाले, ‘निष्ठावंतांनीच भगवा हाती घ्या’

भास्कर जाधव यांच्या आव्हानानंतर मोहित कंबोज यांनी आणखी एक नवे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी “भास्कर जाधव सत्यापासून दूर पळू शकत नाही, आईचे दूध प्यायले असेल तर मी सांगितलेल खोट आहे हे सिद्ध करा, असे म्हणत जो आयुष्यात एका पक्षाचा नव्हता, तो कोणाचा असेल का, तुमच्या सारखे पक्ष बदलणारे रस्त्यावर विकले जातात,” अशी टीका केली आहे.

या ट्विटसोबत मोहित कंबोज यांनी एक व्हिडिओही ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी “गुवाहाटीला जाताना किती वेळा फोन केला, उद्धव ठाकरे यांना काय काय बोलला, याचे सत्य बाहेर आल्यामुळे तुम्ही चिडला आहात, हा व्हिडिओ सेव्ह करुन ठेवा, तुम्ही २०२४ मध्ये उद्धव ठाकरेंसोबत राहता का हे महाराष्ट्र पाहणार आहे,” अशा शब्दात टीका केली आहे. तसेच या व्हिडिओमध्ये भास्कर जाधव यांनी जिभेला आवर घालण्याचाही इशारा मोहित कंबोज यांनी दिला आहे..

तत्पुर्वी मोहित कंभोज यांच्या कालच्या खुलाश्यानंतर भास्कर जाधव यांनी जर शंभर बापांची पैदास असेल, तर हा आरोप सिद्ध करणार नाही आणि तो जर शंभर बापाची पैदास नसेल, तर त्याने यातील एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा”, असं आव्हान त्यांनी कंबोज यांना दिले होते. या ट्विटनंतर आता भास्कर जाधव आणि मोहित कंबोज यांच्यामधील वाद चांगलाच वाढणार असल्याचे दिसत आहे.

Exit mobile version