ठाकरे गटाच्या उपनेत्यांनी घेतला पदाधिकाऱ्यांचा समाचार; म्हणाले, ‘निष्ठावंतांनीच भगवा हाती घ्या’

  • Written By: Published:
ठाकरे गटाच्या उपनेत्यांनी घेतला पदाधिकाऱ्यांचा समाचार; म्हणाले, ‘निष्ठावंतांनीच भगवा हाती घ्या’

अहमदनगर : शिवसेनेतील खासदार, आमदार आणि इतर नेते उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सोडून गेल्यानंतर आता ठाकरे गट अॅक्शन मोडमध्ये आला. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने, ठाकरे गटाकडून शिवगर्जना अभियान हाती घेण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आज अहमदनगर शहरातील माऊली सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिवगर्जना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांची उपस्थिती कमी होती. या कार्यक्रमात काही खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे संतापलेले ठाकरे गटाचे उपनेते विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) व विजय कदम (Vijay Kadam) यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवाय पक्षात पडलेल्या फुटीनंतर आता पक्ष मजबुतीसाठी ठाकरे गटाकडून हालचाली केल्या जाताहेत. त्याचाच भाग म्हणून ठाकरे गटाकडून शिवगर्जना अभियान होती घेण्यात आले. मात्र, अमदनगरधील या शिवगर्जना अभियानाच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची अपेक्षित उपस्थिती नसल्याने उपनेत्यांनी पदाधिकाऱ्यांचा खास शैलीत समाचार घेतला.

यावेळी विजय कदम म्हणाले, की पदाधिकारी ४० वर्षे काम करूनही सभागृहातील ९०० खुर्च्या भरत नसतील तर हे योग्य नाही. अहमदनगर शहरात महापौर पदासह २२ नगरसेवक शिवसेनेचे आहेत. तरीही सभागृह भरले नाही. शिवसेनेत सर्वात मोठे पद शिवसैनिक आहे. ही ताकद जागी करून माणसे आणा, हे सांगावं लागतं हे दुर्दैवी बाब आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायला ८०० लोकही येत नाहीत, हे पदाधिकाऱ्यांना योग्य वाटते का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

विरोधकांच्या ‘त्या’ टीकेवर श्रीकांत शिंदे संतापले, ‘कशा प्रकारच्या टीका करायच्या हे विरोधकांना समजायला पाहिजे’

तर विनोद घोसाळकर म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यात एकवेळ चार आमदार होते. आता एकही आमदार नाही. राज्यातील शिवसेनेच्या फुटीशी याचा संबंध नाही. पदाधिकारीही जुनेच असूनही आज जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार नाही. एकमेकांचे पायखेचायचे असतील तर आत्ताच जा! निष्ठावंतांनीच भगवा हाती घ्या. एकमेकांच्या तक्रारी करण्याचे धंदे बंद करा. गेलेल्या जागा पुन्हा निवडून आणा, असे आदेश त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube