Central Railway Mega Block : मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेचा आज ब्लॉक आहे. (Mega Block ) यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमांक १०-११ वरून २४ डब्यांच्या प्रवासी गाड्या चालवण्यासाठी सुरू असलेल्या फलाट (Mumbai Railway ) लांबीकरणाच्या कामातील ब्लॉकचा शेवटचा टप्पा शुक्रवारी मध्यरात्री साडेबारानंतर सुरू झाला असून तो रविवार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत चालणार आहे. (Central Railway) त्यावेळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोडपर्यंत लोकल बंद राहणार आहेत. ब्लॉकवेळेत सिग्नलसंबंधी तांत्रिक कामं करण्यात येणार आहेत.
जयपूरशी माझं घट्ट नातं; शूटींगदरम्यान भूमीच्या बालपणीच्या आठवणींना उजाळ
अतिरिक्त बसगाड्या
ब्लॉक सुरू असताना अनेक प्रवाशांची गैरसोय होते. त्याची दखल घेत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थाप राम करन यादव यांनी प्रवाशांना आवाहन केलं आहे. त्यामध्ये सीएसएमटी आणि ठाणे ब्लॉक वेळेत रेल्वे स्थानकातील प्रवासी गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक असेल तरच रेल्वे प्रवास करावा. शक्य असल्यास रेल्वे प्रवास टाळावा, असे आवाहन त्यांनी केलं आहे. आज, शनिवारी रविवारच्या (सुट्टीच्या) वेळापत्रकानुसार लोकल धावणार आहेत. यामुळे ५३४ लोकल आणि ३७ मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहे. प्रवासी सुविधेसाठी एसटी आणि बेस्टने प्रवासी सुविधेसाठी अतिरिक्त बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
चर्चगेटवरून बेस्ट बस
खासगी-सरकारी कर्मचाऱ्यांना दुसरा आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. मात्र, आज, पहिला शनिवार असल्याने कर्मचाऱ्यांना कामावर जाव लागणार आहे. शनिवारी सुट्टी न मिळालेल्या आणि अत्यावश्यक सेवेतील कल्याण-कसारा-कर्जत दिशेकडील कर्मचाऱ्यांना दादर स्थानकातून पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करून चर्चगेटपर्यंत पोहोचावे लागणार आहे. चर्चगेटवरून बेस्ट बस, शेअर टॅक्सीच्या मदतीने सीएसएमटी, फोर्ट परिसरातील कार्यालय-आस्थापनांमध्ये पोहोचणं शक्य आहे. हार्बरमार्गे येणाऱ्या प्रवाशांना वडाळा रोड स्थानकात उतरून रस्ते मार्गे बस-टॅक्सीमधून कार्यालयात पोहोचणं शक्य होणार आहे.
Railway Job : भारतीय रेल्वेत 4660 पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 52 हजार रुपये पगार
दुसरा ब्लॉक घेऊ नये
त्याचबरोबर या ब्लॉकच्या काळात सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड या दरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. प्रवाशांचे हाल टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने रविवारी कोणताही ब्लॉक घेऊ नये, असं आवाहन मध्य रेल्वेने केले होतं. मध्य रेल्वेच्या आवाहनाला प्रतिसाद देत, पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील रविवारचा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रविवारी फोर्ट परिसरातील श्रमिक, नोकरदार आणि स्वयंरोजगारीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दादर-चर्चगेटमार्गे प्रवास करून पोहोचण्याचा पर्याय मोकळा असणार आहे.