वाघ वाघ म्हणता आणि उंदीर खाता, आशिष शेलारांचा ठाकरेंवर हल्ला

मुबई : राज्य विशिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेत आज मुंबई च्या प्रश्नावर विशेष चर्चा लावण्यात आली होती. या चर्चेत बोलताना आशिष शेलार यांनी मुंबई मधील वेगवेगळ्या योजनेत झालेले घोटाळे, आणि विस्कळीत झालेल जनजीवन यावर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यानी मुंबईत उंदीर मारण्यात येणाऱ्या योजनेत कसा घोटाळा झाला यावर प्रकाश टाकला. वाघ वाघ म्हणतात आणि उंदीर खातात? अस […]

ashish shelar uddhav thackeray

ashish shelar & uddhav thackeray

मुबई : राज्य विशिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेत आज मुंबई च्या प्रश्नावर विशेष चर्चा लावण्यात आली होती. या चर्चेत बोलताना आशिष शेलार यांनी मुंबई मधील वेगवेगळ्या योजनेत झालेले घोटाळे, आणि विस्कळीत झालेल जनजीवन यावर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यानी मुंबईत उंदीर मारण्यात येणाऱ्या योजनेत कसा घोटाळा झाला यावर प्रकाश टाकला. वाघ वाघ म्हणतात आणि उंदीर खातात? अस सांगत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर हल्ला केला.

मुंबई महापालिकाने गेल्या वर्षभरात 11 लाख 23 हजार उंदीर मारले . हे उंदीर मारण्यासाठी प्रत्येकी 23 रुपये खर्च आला आहे. आशिष शेलार म्हणाले या प्रकरणची चौकशी करण्यासाठी महापालिकेत गेलो. मारलेले उंदीर कुठे पुरले? किती लोक कामाला होते? काही माहिती नाही. अधिकारी म्हणाले फाईल भिजली काही आकडेवारी नाही. अरे काय चाललंय असा संताप आशिष शेलार यांनी व्यक्त केला. एक उंदीर मारायला 23 रुपये खर्च झाले. असा अहवाल आहे.

IND vs AUS ODI : ‘या’ भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत 

दुसरीकडे राजवाडी हॉस्पिटल येथे शवगृहात एका व्यक्तीच्या पार्थिव चे हाताची बोटे उंदरांनी खाल्ले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा सेंटर मध्ये एका पार्थिव चे डोळे उंदीरांनी खाल्ले अशा घटना घडल्या आहेत. जर एवढे उंदीर मारले मग हे उंदीर आले कुठून असा सवाल देखील आशिष शेलार यांनी विचारला.

Exit mobile version