मुंबई-पुणे मार्गावर ‘मिसिंग लिंक’ थांबल्यास होणार कारवाई, पोलिसांचे आदेश काय?

मिसिंग लिंक सुरू झाल्यापासून वाहतूक कोंडी आणि अपघातांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा यंत्रणांनी केला आहे.

News Photo   2026 05 03T172851.728

मुंबई-पुणे मार्गावर 'मिसिंग लिंक' थांबल्यास होणार कारवाई, पोलिसांचे आदेश काय?

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ नुकताच (Pune) सुरू झाला आहे. या मार्गावर कुतुहलाने काही प्रवासी सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी वाहनं थांबवतात. परंतु, हा प्रकार प्रवाशांना महागात पडणार आहे. या मार्गावर असं फोटोसाठी कुणी थांबलं तर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो. त्यामुळं कुणीही गाडी थाबवून फोटो काढण्यासाठी थांबू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

महामार्ग पोलिसांनी अधिसूचनेद्वारे मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पासाठी वेग मर्यादा जाहीर केली आहे. तसंच,बोगद्यात हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी १०० किमी वेग मर्यादा आणि बस व प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी वेग निश्चित केला आहे. कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील दोन बोगदे व दोन पुलावर पूर्णपणे २४x७ सीसीटीव्ही यंत्रणेचे लक्ष आहे.

कालच सरकारकडून थाटात उद्घाटन! पुण्यावरून मुंबईला येणारी मिसिंग लिंकची लेन बंद का?

यावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष असून द्रुतगती मार्गावर थांबणाऱ्या गाड्यांची माहिती महामार्ग पोलिसांना दिली जाणार आहे. सेल्फी, फोटो आणि रिल काढण्यासाठी थांबू नका नाहीतर मोठ्या दंडाची आकारणी होऊ शकते. तसेच तुमच्यासह इतरांच्याही वाहनांना धोका होऊ शकतो. या कारणास्तव, नियमांचे पालन करा आणि सुरक्षित, सुखकर प्रवास करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

मिसिंग लिंक सुरू झाल्यापासून वाहतूक कोंडी आणि अपघातांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा यंत्रणांनी केला आहे. पूर्वी दररोज 10 ते 15 अपघात किंवा कोंडीबाबत कॉल येत होते, मात्र आता एकही कॉल नियंत्रण कक्षाला आलेला नाही. दरम्यान, भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनीही मिसिंग लिंकवर फोटो काढल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट शेअर करत प्रकल्पाचं कौतुक केलं, मात्र यावरून वाहतूक नियमांच्या पालनाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Exit mobile version