कालच सरकारकडून थाटात उद्घाटन! पुण्यावरून मुंबईला येणारी मिसिंग लिंकची लेन बंद का?

पुण्यावरून मुंबईला येणारी मिसिंग लिंकची लेन सध्या बंद असल्याचं समोर आलं आहे.

News Photo   2026 05 02T142057.381

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागात मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्यात आला आहे. (Pune) मुंबई-पुणे मिसिंग लिंक या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण दुसरीकडे पुण्यावरून मुंबईला येणारी मिसिंग लिंकची लेन सध्या बंद असल्याचं समोर आलं आहे, आणखी दोन ते तीन दिवसांनंतर ही लेन सुरू होईल अशी माहिती समोर आली आहे.

पुणे एक्सप्रेस हायवेवरील लोणावळा घाटातील मिसिंग लिंक काल सुरू झाली असली तरी अद्याप पुणे वरून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद आहे. पुणे ते मुंबई जाणारी मार्गिका बंद असल्याने लोकांवर जुन्या मार्गाने जाण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. मिसिंग लिंकचा वापर करता येत नसल्याने वाहनधारक नाराज असल्याचं दिसून येत आहे. पुणे ते मुंबई मार्गिका बंद असल्याची सुचना वाहतूक पोलीसांकडून दिली जात आहे.

याबाबत माहिती समोर आली आहे की, अजून दोन ते तीन दिवस लागणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुण्यावरून मुंबईला येणाऱ्या मार्गीकेवरील काही काम अद्याप बाकी आहे, त्यामुळेच दोन-तीन दिवसानंतर पुण्यावरून मुंबईला जाणारी मिसिंग लिंक सुरू होईल, अशीही माहिती समोर आली आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर मिसिंग लिंक खुली, आधी ब्रेक, आता एक्सेलेटर, मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी

काल उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं स्टेज असल्यामुळे पुणे ते मुंबई लेन काही काळासाठी बंद होती, मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती लोणावळा घाटात आज वाहतूक कोंडी नाही, काल वाहन चालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता, आज सकाळी पासून वाहतूक सुरळीत सुरू आहे. त्याचबरोबर मिसिंक लिंक वरती मुंबई ते पुणे मार्गावर जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे, मात्र पुण्यावरून मुंबईला येणारी वाहतूक बंद होती.

कालच्या उद्घाटनाच्या वेळेस काल प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र, आज कसलीही वाहतूक कोंडी नाही. सकाळपासून वाहतूक सुरळीतपणे चालू आहे, मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या लेन वरून वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे, पण पुण्यावरून मुंबईला येणारी लेन आहे. ती अद्याप सुरू करण्यात आलेली नाही, यासंदर्भामध्ये माहिती घेतला असता अजून दोन ते तीन दिवस लागतील अशा प्रकारची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

follow us