Download App

…तर आम्ही पुन्हा सरन्यायाधीशांकडे जाऊ; नार्वेकरांना आदित्य ठाकरेंचा इशारा!

  • Written By: Last Updated:

मुंबई : शिवसेनेतील आमदार अपात्रतेबाबतच्या निर्णयाबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अवहेलना करू नका. आमदार अपात्रतेबाबत पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत निर्णय घेतला जावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेत. तसेच याशिवाय नार्वेकर यांनी आमदार अपात्रता सुनावणीचे दिलेले वेळापत्रकही न्यायालयाने फटकारले आहे. त्यावरून आता राहुल नार्वेकर व सरकारला विरोधकांना घेरण्यास सुरूवात केली आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही विधानसभा अध्यक्षाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला आहे.

आजची सुनावणी ही फक्त शिवसेनेबद्दल, पटेलांचा दावा आव्हाडांनी खोडला; म्हणाले, ‘ही एकत्रित सुनावणी…’ 

 

 

आदित्य ठाकरे म्हणाले, अध्यक्षांचा टाइमपास चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाने आता एक दणका दिला आहे. त्यामुळे लवकरात लवकर न्याय मिळाले अशा अपेक्षा आहे. फ्री आणि फेअर निर्णय झाला पाहिजे. हा निर्णय वेळेत लागला पाहिजे. दीड वर्ष निर्णय घेण्यात गेले आहेत. हे सरकार तोपर्यंत घोटाळे करत आहेत. कर्नाटकमध्ये 40 टक्के घोटाळे होत होते. परंतु आपल्या राज्यात शंभर टक्के भ्रष्टाचार होत आहे.

कंत्राटी भरतीविरोधात शरद पवार आक्रमक, मुली बेपत्ता होण्यावरुनही सरकारला सुनावले

संविधानविरोधात हे सरकार काम करत आहे. मी सरकारला सरकार मानत नाही. आमदार अपात्रतेबाबत अध्यक्षांनी लवकर व योग्य निर्णय घ्यावा. नाहीतर सरन्यायाधीशांकडे पुन्हा जाऊ, असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला आहे. या सरकारवर सर्व जनता नाराज असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.

सरकारवर निशाणा साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे. राज्यातील घोटाळे लोकांसमोर येत आहेत. मुंबई, महाराष्ट्राची लूट होत आहे. ही लूट किती सहन करायची आहे. किती घोटाळे सहन करायचे आहे.

टोलबाबत बोलण्यास नकार
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांची आज बैठक झाली. त्यात मुंबई, राज्यातील इतर भागाताबाबत काही निर्णय घेण्यात आले. त्यावर आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आल्यानंतर ते जास्त बोलले नाहीत. अनेक संघटना आहे. ते अजेंडा घेऊन असतात. त्याबाबत मी आता बोलणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Tags

follow us