अजित पवार गटाला कोर्टाचे अभय? प्रफुल्ल पटेलांचा दावा आव्हाडांनी अर्ध्या तासात निकाली काढला

  • Written By: Published:
अजित पवार गटाला कोर्टाचे अभय? प्रफुल्ल पटेलांचा दावा आव्हाडांनी अर्ध्या तासात निकाली काढला

Jitendra Awhad: आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांकडून दिरंगाई केली जात असल्याप्रकरणी ठाकरे गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. यानंतर माध्यमांशी बोलतांना प्रफुल्ल पटेलांनी (Praful Patel) राष्ट्रवादीची केस सुनावणीसाठी घेतलीच नाही. कोर्टाने अजित पवार गटावर कोणतेही ताशेरे ओढले नाहीत, असं म्हटलं. यावर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाष्य केलं.

कंत्राटी भरतीविरोधात शरद पवार आक्रमक, मुली बेपत्ता होण्यावरुनही सरकारला सुनावले 

आजच्या सुनावणीत कोर्टाने विधासभा अध्यक्षांना चांगलचं खडसावलं. हा पोरखेळ सुरू आहे. कोर्टाला दिलेलं वेळापत्रक कोर्टाला मान्य नाही, त्यामुळं कोर्टाला नवीन शेड्युल द्यावं. तुम्ही आदेशाची पायमल्ली करत आहात, असं कोर्टाने म्हटलं आहे.

दरम्यान, आव्हाडांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलत असतांना ते म्हणाले की, सर्वाच्च न्यायालयाने 8 तारखेला एक आदेश काढला. त्यात कोर्टाने सांगितलं की, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पीटीशन सारख्याच आहेत. त्यामुळं यावर एकत्रित सुनावणी घेणार आहोत. हे कोर्टाने आठ तारखेला सांगितलं. त्यामुळं आजची सुनावणी ही एकत्रित झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे.

प्रफुल्ल पटेल खोट बोलतात का, असा प्रश्न विचारला असता आव्हाड म्हणाले, ते काय बोलतात मला ठाऊक नाही. पण, आज झालेली सुनावणी ही एकत्रित सुनावणी होती. कोर्टानं विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. नवीन शेड्युल कोर्टाने द्यायला सांगितलं. त्यामुळं आता विधानसभा अध्यक्षांना दोन्ही पक्षांबाबत एकत्रित वेळापत्रक द्यावं लागेल.

आव्हाड म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने एक वाक्य उच्चारलं. ते माझ्या दृष्टीने या सुनावणीत सर्वात महत्वाचं आहे. ते वाक्य म्हणजे, तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं गांभीर्याने घेत नाही. जेव्हा सर्वोच्च न्यायालय म्हणते की तुम्ही आम्हाला गांभीर्याने घेत नाही, तेव्हा त्याचा अर्थ काय आहे, हे मला सांगायची गरज नाही, असं आव्हाड म्हणाले.

काय म्हणाले पटेल?
आज सुप्रीम कोर्टात झालेली सुनावणी ही फक्त शिवसेनेबद्दल झाली. आमच्या प्रकरणावर मंगळवारी सुनावणी होणार असल्याचे ओरली कोर्टाने सांगितले. शिवसेना आणि राष्ट्रवादीची एकत्रित सुनावणी झाली, ही माहिती खोटी आहे. आमची 16 नंबरची केस होती आणि शिवसेनेची केस नंबर 19 वी होती. आज फक्त 19 क्रमांकाच्या केसची सुनावणी झाली. दोन्ही केसेस भिन्न आहेत, आमचे वकील मुकुल रोहतगी न्यायालयात होते. सुनावणी झाली असती तर ते काहीतरी बोलले असते असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

 

 

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube