Download App

मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरमधला फरकही कळत नाही; आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

Aditya Thackeray : मुंबई महापालिकेने स्ट्रीट फर्निचर घोटाळा (Street Furniture Scam) केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) केला होता. शिवाय, मुंबईतील साडेआठ हजार कोटींची रस्त्यांची कामेही रखडली आहेत. यावरूनही त्यांनी सरकारवर सातत्याने हल्लाबोल केला होता. आताही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागलं. केंद्राच्या आदेशाने महापालिकेची लूट सुरू आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना टॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरमधील फरकही कळत नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.

U-Turn ते शहर लखोत, 2023 मधला पर्यंतची प्रियांशू पैन्युलीचा प्रवास, पाहा फोटो… 

आज आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मुंबईतील रस्त्यांची कामे साधारणणे 1 ऑक्टोबर ते 31 मे या कालावधीत पूर्ण होत असतात. मात्र, अजूनही कामे पूर्ण झाली. दक्षिण मुंबईतील रस्ते अजून एक वर्ष पूर्ण होणार नाहीत. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार पाडलं तेव्हा या रस्त्यांची 83 टक्के काम पूर्ण झाली होती. असं असतांना उर्वरित काम करायला यांना दीड वर्ष लागतात तरी कशी, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

संजय राऊतांना धक्का! कोविड घोटाळ्यात पाटकर अन् भागीदारांची 12 कोटींची संपत्ती जप्त 

ते म्हणाले, रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाहीत, याला घटनाबाह्य मुख्यमंत्री जबाबदार आहे. सर्व रस्ते कॉन्ट्टरॅक्टरला दिले. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना टॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर यातला फरक कळत नाही. त्यांच्याकडून अपेक्षित तरी काय करणार? मुंबईतील रस्त्यांमध्ये घोटाळा झाला. घटनाबाह्य मुख्यमंत्री केंद्राच्या मदतीने केवळ लुटमार करत आहेत.

नवी मुंबईतील मेट्रो लाईन पाच महिने बंद होती. आम्ही दबाव आणल्यावर मेट्रो लाईन सुरू करावी लागली. दिघा स्टेशन आठ महिन्यांपासून तयार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना उद्घाटन करायला तयार नाही. आपल्याच जिल्ह्यात मुख्यमंत्री वेळ देऊ शकत नाहीत, तर ते उर्वरित राज्यात काय वेळ देणार, असा सवाल त्यांनी केला. उद्घाटनाला वेळ नसल्यानं राज्यातील अनेक प्रकल्प रखडले आहेत, असंही ठाकरे म्हणाले.

अंतिम आठवडा प्रस्तावात बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. याविषयी विचारले असता आदित्य म्हणाले की, भाजपने मुख्यमंत्र्यांना एक स्क्रिप्ट दिली. ते तेवढचं बोलतात. दीड वर्षापासून ते लिहून दिलेलंच बोलतात. भाजपनेही त्यांच्या स्किप्टमध्ये बदल केला नाही. कारण, त्यांनाही ठाऊक आहे, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची पिक कॅपॅसिटी तेवढीच आहे.

146 खासदारांचं निलंबन कऱण्यात आलं. यावरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं. दोन तरुणांनी संसदेत घुसखोरी केल्यानं खासदारांनी प्रश्न विचारले तर त्यांना निलंबित केलं जातं, हे फार दुर्देवी आहे. संसदेत विरोधकांची आवाज क्षीण केल्या जातो. आपला देश हुकुमशाहीकडे सरकत आहे. सध्याचे सरकार केवळ विरोधकांच्या विरोधात नाही. तर देशाच्या आणि लोकशाहीच्या विरोधात आहे, असं ते म्हणाले.

Tags

follow us