Download App

Aditya Thackery : पालिकेच्या केबिन मंत्र्यांना बिल्डिंग उभारण्यासाठी देत आहात का? आदित्य ठाकरेंचा सवाल

Aditya Thackery : मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना महानगर पालिकेत कार्यालय देण्यात आलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे भडकले आहेत. धक्कादायक बातमी अशी आहे की, मुंबई महानगर पालिकेमध्ये दोन केबिन पालकमंत्र्यांना दिली आहेत. केबिन देण्याची गरज का पडली. ही प्रथा चुकीची आहे. अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. ( Aditya Thackery Criticize Mangalprabhat Lodha on Cabin in BMC )

Big B साकारणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका? काय असणार सिनेमाची कहाणी 

काय म्हणाले आदित्य ठाकरे?
मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना महानगर पालिकेत कार्यालय देण्यात आलं आहे. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, धक्कादायक बातमी अशी आहे की, मुंबई महानगर पालिकेमध्ये दोन केबिन पालकमंत्र्यांना दिली आहेत. बाजार समितीची एक आणि शिक्षण समितीची केबिन देण्यात आली आहे. महानगर पालिकेच्या केबिन मंत्र्यांना देण्याची गरज का पडली? कॅसबीएमसी किंवा बीएमसिनो टॉवर बांधायची आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केली आहे.

‘हे फार अभ्यास करुन आलेत’; गुलाबराव पाटील अन् आदित्य ठाकरे सभागृहातच भिडले

जर महानगर पालिकेच्या केबिन मंत्र्यांना देण्यात येत असतील तर त्या बिल्डिंग प्रोपोसल उभारण्यासाठी दिल्या जात आहेत का? जर अशी परिस्थिती असेल तर माझी मागणी आहे की, प्रत्येक महापौरांना मंत्रालयात केबिन द्या. आम्हा मुंबईच्या सगळ्या आमदारांना केबिन द्या. अशी मागणी यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

तर मणिपूरच्या घटनेवर बोलताना ते म्हणाले की, कुठे गेले तुमचे देशप्रेम? मणिपूरच्या घटनेने देशाची बदनामी झाली आहे. मणिपूर सरकार बरखास्त केलं पाहिजे. राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. मणिपूरमध्ये ज्या महिलांवर अत्याचार झाले, त्यातील एक महिला कारगिल युद्धातील लढलेल्या सुभेदाराची पत्नी आहे.

तसेच अतुल भातखळकरांनी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारल्यावर दिलेल्या प्रतिक्रेयेवर आदित्या ठाकरे म्हणाले की, अशा निर्लज्ज लोकांवर मी उत्तर देत नाही. यांच्या सहकाऱ्यांनी गुजरातमध्ये रेपिस्टचं स्वागत केलं. हे क्रूर, निर्लज्जपनावर बोलायचं नाही.

Tags

follow us