‘हे फार अभ्यास करुन आलेत’; गुलाबराव पाटील अन् आदित्य ठाकरे सभागृहातच भिडले

‘हे फार अभ्यास करुन आलेत’; गुलाबराव पाटील अन् आदित्य ठाकरे सभागृहातच भिडले

Gulabarao Patil Vs Aaditya Thackeray :  विधानसभेमध्ये आज पाणीपुरठा मंत्री गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगल्याचे पहायला मिळाले. यामध्ये गुलाबराव पाटील यांनी आक्रमक होत सभागृहात ठाकरेंना सुनावले. सभागृहामध्ये ज्या विमानतळांचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे, त्यावर चर्चा सुरु होती. यावरु

यावेळी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर विमानतळाविषयी प्रश्न उपस्थित केला. त्याठिकाणी विमानतळाला परवानगी का नाकारण्यात आली, असे त्यांनी विचारले. तसेच एका कारखान्याच्या चिमणी काही दिवसांपूर्वी पाडण्यात आली. त्यावेळी तिथे छावणीच स्वरुप आले होते. यामध्ये काय राजकारण होते ते मला माहित नाही.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

यावर मंत्री गुलाबराव पाटील यांना प्रश्नाचे समाधान करता आले नाही. त्यावर भाजपचे सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी सभागृहाला माहिती दिली. त्यावरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सभागृहात एका सदस्यांना मंत्री महोदयांच्या मदतीला यावे लागले. त्यामुळे ज्याकाही लक्षवेधी असतात त्यावर मंत्र्यांचा अभ्यास पक्का असावा, असे म्हणत आदित्य ठाकरेंना गुलाबराव पाटलांना टोला लगावला.

यावर, मला माहित आहे की,  आदित्य ठाकरे हे फार अभ्यास करुन आले आहे, असे म्हणत आदित्य ठाकरेंना उत्तर दिले. तसेच आईच्या पोटी कोणी हुशार म्हणून जन्माला येत नाही. तुम्हाला विमातळाचे प्रश्न माहित असतील तर आम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती आहे, असे म्हणत गुलाबराव पाटील हे सभागृहात चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायाला मिळाले.

Manipur Violence : ‘समान नागरी कायद्याच्या गप्पा मारताय, आधी मणिपूरकडे बघा’; राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

दरम्यान, हे अधिवेशन सुरु होण्यापूर्वी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडील काही खाती ही अधिवेशन काळापुर्ती इतर मंत्र्यांकडे देण्यात आली आहे. अधिवेशनकाळामध्ये संबंधित खात्यासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी इतर मंत्र्यांकडे ही खाती देण्यात आली आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्याकडे संबंधित खात्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

यानंतर लेटस्अप मराठीचे प्रतिनीधी प्रफुल्ल साळुंखे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संवाद साधला. तेव्हा गुलाबराव म्हणाले की, “हे सर्व प्रश्न स्कोपच्या बाहेरचे होते. ही लक्षवेधी स्पेसिफीक ज्या विमानतळांचे लायसन्स रद्द करण्यात आले त्यावर सुरु होती. याविषयी सगळी माहिती माझ्याकडे होती. पण इतर प्रश्न आल्याने 70 मिनीट ही लक्षवेधी चालली. स्कोपच्या बाहरेचा प्रश्न असेल तर माहिती घेऊनच बोलावे लागते.”

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube