Download App

‘आदित्य ठाकरेंनी संधी दिली म्हणून नेते झाले, पदं उपभोगून झाल्यावर अन्याय कसा?’

Varun Sardesai On Rahul Kanal : ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. कनाल हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्यानं हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावर ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांची प्रतिक्रिया आली आहे. सर्व पद उपभोगून झाल्यानंतर अन्याय झाला म्हणून आरोप करणं चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

वरुण सरदेसाई म्हणाले की राहूल हा माझा चांगला माझा मित्र आहे. आम्ही बरीच वर्षे एकत्र काम केले. आता शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर प्रत्येकाला काहीतरी कारणं मिळायला लागली आहेत. जेव्हा युवा सेनेची स्थापना केली होती. त्यावेळी त्यांनी अनेक युवा चेहऱ्यांना कोअर कमिटीत जागा दिली होती. कोअर कमिटीतील लोकांना पक्षाने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. अनेकांना टिकीट दिले, कोअर कमिटीचे सदस्य कोणी नगरसेवक झाले, मोठाले पदं मिळाली. आदित्य ठाकरे यांनी संधी दिल्यामुळे अनेकजण नेते झाले. मग प्रत्येकाला वाटायला लागले की आमच्यावर अन्याय झाला. ही सर्व पद घेतल्यानंतर अन्याय झाला म्हणून आरोप करणं चुकीचे आहे, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले.

औरंगाबाद की छ.संभाजीनगर? : पवारांनी बसवलेला धुराळा फडणवीसांनी पुन्हा उडवला

मुंबई महापालिकेत ठाकरे गटाची अनेक वर्षे सत्ता होती. याकाळात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्या भ्रष्ट्रचारावरुन लक्ष हाटवण्यासाठी मोर्चा काढला जात आहे असा आरोप भाजप आणि शिंदे गटाकडून केला जात आहे. यावर वरुण सरदेसाई म्हणाले की घोटाळे झाले हा त्यांचा फक्त आरोप आहे. आजपर्यंत काही सिद्ध करु शकले नाहीत. जे विरोधात बोलतात त्यांना चौकशी संस्थांच्या माध्यामातून धाडी टाकून भिती दाखवायची. हा एकमेव कार्यक्रम देशभरात सुरु आहे. विरोधकांवर दबाव टाकायचा आणि बदनाम करायचे हे सरकारचे धोरण आहे. पण सिद्ध करु शकले नाहीत. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत जेव्हा आरोप करतात त्यावेळी त्यांच्याकडे कागदपत्र असतात, असे सरदेसाई यांनी म्हटले.

सरकारवरील यथेच्छ टिकेनंतरही CM शिंदेच्या शिलेदाराने थोपटली अजितदादांची पाठ

सूरज चव्हाण यांना मी अतिशय जवळून ओळखतो आहे. गेले अनेक वर्षे आम्ही सोबत काम केले आहे. शिवसेनेचे निष्ठावंत वाघ आहेत. ईडीचे अधिकारी प्रश्न विचारत आहेत त्याला ते सामोरे जात आहेत. या सर्वातून ते बाहेर पडतील. आज देखील शिवसेनेचं संघाटत्माक काम पार पाडत आहेत. शिवसेनेचे किंवा विरोधी पक्षातील नेते आणि कार्यकार्त्यांनी भाजप विरोधात टीका केली की त्यांच्यावर ईडीची कारवाई होते आहे. हे काही पाहिले उदाहर नाही. संपूर्ण देशभरात हे सुरु आहे, अशी टीका वरुण सरदेसाई यांनी केली.

Tags

follow us