सरकारवरील यथेच्छ टिकेनंतरही CM शिंदेच्या शिलेदाराने थोपटली अजितदादांची पाठ
Dada Bhuse On Ajit Pawar : आज शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला सत्ता स्थापन करून एक वर्ष झालं. या वर्षपुर्तिनिमित्त विरोधी पक्षनेते अजित पवारांचा (Ajit Pawar) एका वृत्तपत्रामध्ये लेख प्रकाशित झाला. या लेखात अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जोरदार समाचार घेतला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आजवरचे सर्वात अपयशी मुख्यमंत्री असल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान, यावर आता राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवारांनी निराशेपोटी आपल्या मनोगतात मुख्यंत्र्याविषयी असं लिहिल्याची भुसे म्हणाले. (Dada Bhuse on Ajit Pawar they Said ajit pawar critiseze cm shinde deu to Disappointment)
https://www.youtube.com/watch?v=fgNKR9V0d6M
आज दादा भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेविषयी मंत्री भुसेंना विचारले असता ते म्हणाले, अजित पवार यांनी टीका केली आहे की, सरकार मधील सर्वात अपयशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. अजित पवारांनी असं कदाचित निराशेपोटी मनोगत व्यक्त केलं असेल, असं भुसेंनी सांगितलं. वस्तुस्थिती अशी आहे की, त्या काळात अजित पवार हे व्यक्ती म्हणून धडाक्याने काम करायचे. पण तो धडाका इतका होता की, आम्हालाही सत्तेतून बाजुला सारलं जातं होतं. कदाचित आम्हाला बाजूला सारलं नसतं तर….. असं अर्धवट वाक्य बोलून भुसे मिश्किल हसले. दरम्यान, सगळे जण अतिशय पारदर्शक आणि गतीमानपणे काम करत असल्याचं मंत्री भुसे म्हणाले.
Ameya Khopkar यांनी पाकिस्तानी कलाकार अन् निर्मात्यांना दिला दम; म्हणाले, तंगड्या तोडून…
काही दिवसांपूर्वी ईडीने मुंबई महापालिकेच्या कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी कारवाई चौकशी केली. यात ठाकरेंचे निवकवर्तीय सुरज चव्हाण अडचणीत आले. असं असतांना ठाकरे गटाने मुंबई महापालिकेत भ्रष्ट्राचार असल्याचा आरोप करत महानगरापालिकेतील ठेवी संदर्भात सरकारला जाब विचारण्यासाठी १ जुलै रोजी मोर्चा काढण्याचं ठरवलं. यावरही सामंत यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, पाठीमागील काळातील भ्रष्ट्राचाराची प्रकरणी उघडकीस येऊ लागली आहेत. त्यांच्या चौकशा सुरू असून अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं या कारवायांवरील लक्ष हटवण्यासाठी हा मोर्चा असल्याचं भुसे म्हणाले.
काल नाशिक शहरात बकरीदच्या पार्श्वभूमीवर शहरात गुलशनाबाद असे फलक लागले होते. ईदच्या शुभेच्छा देणार्या फलकावर नाशिक ऐवजी शहराचा उल्लेख गुलशनाबाद असा केला. या पोस्टरवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावरही भुसेंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, माझ्याही कानावर ही बाब आली आहे. या संदर्भात पोलिसांशी बोलणार आहे. कोणीतरी मुद्दाम हा खोडसाळपणा केला. ज्यांनी हे शहरात पोस्टर लावले आहेत. त्यांच्यावर पोलीस योग्य ती कारवाई करतील, असं मंत्री भुसेंनी सांगितलं.