Download App

अयोध्या आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Budget 2024 : 22 जानेवारीला अयोध्येत राममंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली होती. श्रीरामच्या दर्शनाला आयोध्येत जाणाऱ्या भाविकांची संख्या महाराष्ट्रातून सर्वाधिक आहे. या भाविकांच्या किफायतशी दरामध्ये उत्तम सेवा पुरवण्यासाठी श्रीनगर आणि अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पात (Budget 2024) केली आहे.

या दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र सरकारने मोक्याच्या जागा उपलब्ध करुन घेतल्या आहेत. या जागांसाठी 77 कोटींची तरतूद प्रस्तवित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोकण विभागात पर्यटनास चालना देण्यासाठी शिवकालीन 32 गट किल्ल्यांचे नूतनीकरण व संवर्धन करण्यात येणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

रेल्वे, रस्त्यांच्या प्रकल्पांसाठी अजितदादांकडून भरघोस निधी; नवे प्रकल्पही घोषित

उपमुख्ममंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडला. पहिल्या चार महिन्यांसाठी तरतुद करण्यासाठी अंतरिम अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी करु रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प त्यांनी सादर केला. राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘महायुतीचे कंत्राटदार जोमात अन् शेतकरी कोमात’; अर्थसंकल्पावरुन ठाकरेंनी धारेवरच धरलं

अजित पवार यांनी अर्थसंकल्पात काय दिले?
– 1 लाख महिलांना रोजगार, 37 हजार आंगणवाडींना सौर ऊर्जा
– 40 टक्के अपारंपारिक उर्जा राबविणार आहे
– ⁠37 हजार आंगणवाडीना सौर उर्जा दिली जाणार आहे.
– ⁠44 लाख नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 3 हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.
– ⁠1 लाख महिलांना रोजगार दिला जाईल.
– ⁠पाच हजार पिंक रिक्षा महिलांसाठी दिल्या जाणार आहेत.
– ⁠आंगणवाडी सेविकांची 14 लाख पदं भरण्यात आली आहेत.
– 7 हजार 500 किमीची रस्त्याची कामे हातात घेण्यात येणार आहेत.
– सार्वजनिक बांधकाम विभागाला 19 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
– भारतातील पहिली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भुसंपदान पूर्ण झाले आहे.
– सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या रेल्वे मार्गासाठी भुसंपादन सूरू आहे.
– जालना-यवतमाळ, पुणे-लोणावळा रेल्वे मार्गासाठी 50 टक्के रक्कम सरकार देईल. ही चौथी मार्गिका असणार आहे.
– रत्नागिरी भागवत बंदरासाठी 300 कोटी रुपये
– मिरकरवाडा बंदर नव्याने करण्यात येतं आहे.
– संभाजीनगर विमानतळ विस्तारासाठी अर्थिक तरतूद करण्यात येत आहे.
– अमरावती जिल्ह्यातील वेल्लोरा येथे रात्रीचे विमान उतरण्यासाठी काम सुरू आहे.

follow us

वेब स्टोरीज