‘महायुतीचे कंत्राटदार जोमात अन् शेतकरी कोमात’; अर्थसंकल्पावरुन ठाकरेंनी धारेवरच धरलं

‘महायुतीचे कंत्राटदार जोमात अन् शेतकरी कोमात’; अर्थसंकल्पावरुन ठाकरेंनी धारेवरच धरलं

Udhav Thackeray On Budget : सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे महायुतीचे कंत्राटदार मित्र जोमात अन् शेतकरी कोमात असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावरुन धारेवरच धरलं आहे. दरम्यान, राज्य विधी मंडळात अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अजित पवार यांच्याकडून रस्ते, रेल्वेमार्गांबाबत अनेक नवनवीन घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

मनोज जरांगेंशी काही देणं-घेणं नाही, पण त्यांचा बोलवता धनी शोधणारच : देवेंद्र फडणवीसांचा इशारा

उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांना दुष्काळ, अवकाळी पावसाचा जसा फटका बसलायं तसाच फटका या अंतरिम अर्थसंकल्पाच्या घोषणांमुळे बसत आहे. राज्य सरकारच्या या अंतरिम अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलेलं नाही. राज्यात महायुती सरकारकडून अनेक घोटाळे केले जात आहेत. त्यापैकी मुंबईत रस्ते घोटाळा, यासोबतच आणखीनही घोटाळे आहेत. आधीच्या टेंडरमधला भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढतो सांगून टेंडर काढल्यावर पुन्हा नव्याने टेंडर पास करीत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

चव्हाणांनंतर काँग्रेसला मराठवाड्यात आणखी एक मोठा धक्का : कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचा राजीनामा

तसेच महायुतीच्या सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे महायुतीचे कंत्राटदार मित्र जोमात अन् शेतकरी कोमात असल्याचीच परिस्थिती असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. राज्यात सध्या आशासेविका, अंगणवाडी सेविका संपावर आहेत. सरकारी रुग्णायांमध्ये डॉक्टर, परिचारिकांचा स्टाफ कमी आहे, औषधांअभावी रुग्णांचे उपचार होत नाहीत त्यांच्याकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे. रुग्णालयातील सुविधांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात काहीच घोषणा केली नसल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत .

“मी स्वतः मतं मागते, नवऱ्याला फिरवत नाही” : सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना टोला, नणंद-भावजय वाद तापला

राज्य सरकारकडून नूसत्याच रस्त्याच्या कामांच्या घोषणा केल्या जात आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकारकडून मोठ मोठ्या घोषणा केल्या जात असून राज्यातील गडकिल्ल्यांबाबत महाविकास आघाडी सरकारचंच धोरण सरकारने पुन्हा आखलं असून त्याची पुन्हा घोषणा करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय स्मारकारचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं, मात्र, अद्याप ते पूर्ण झालेलं नाही. ते पूर्ण कोण करणार आहे, या सरकारचं म्हणजे पुढचं पाठ अन् मागचं सपाट असल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला आहे.

https://www.youtube.com/watch?v=XuLEV9soiF8

follow us
  • fb
  • instagram
  • youtube