Download App

Ajit Pawar : ‘भाजपनं नाकारलं म्हणून अनिल देशमुखांनी साथ सोडली’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज कर्जत खालापूर येथील शिबिरात अनेक खळबळजनक खुलासे केले. त्यानंतर पत्रकार परिषदेतही त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला. ज्याची आता राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 2 जुलै रोजी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत असताना झालेल्या सर्व बैठकांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख उपस्थित होते. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून त्यांनी आमच्यासोबत येण्यापासून माघार घेतली. मंत्रिपद नाही तर मी तुमच्यासोबत नाही, असे त्यांनी सांगितल्याचे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर कर्जत खालापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात बोलताना अजित पवार यांनी ही माहिती दिली. यावेळी पक्षाचे खासदार सुनील तटकरे, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आदींसह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Ajit Pawar : बारामती लढणारच! अजितदादांच्या निर्धारानं वाढलं सुप्रिया सुळेंचं टेन्शन

अजित पवार पुढे म्हणाले, अनिल देशमुख आमच्याबरोबर होते. सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी ज्या बैठका झाल्या त्या सगळ्या बैठकांमध्येही अनिल देशमुख सहभागी होते. भाजपकडूम मंत्रिपदासाठी नावं मागवण्यात आली. त्यावेळी अनिल देशमुखांचं नाव दिलं होतं. परंतु, अनिल देशमुखांवर आम्ही बरेच आरोप केले आहेत. आता त्यांना मंत्रिपद दिलं तर आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होतील त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेता येणार नाही, असं भाजपनं स्पष्ट केलं. त्यामुळे अनिल देशमुखाचं नाव वगळलं. मात्र मला मंत्रिपद मिळणार नसेल तर मी तुमच्यासोबत नाही हे स्पष्ट आहे, असे अनिल देशमुख म्हणाले होते, असा खुलासा अजित पवार यांनी केला.

म्हणून फक्त मलाच टार्गेट केलं गेलं 

केसेस होत्या म्हणून आम्ही भाजपबरोबर गेलो असे आरोप आमच्यावर होत आहेत. आरोप झाले. पण, आरोप सिद्ध व्हावे लागतात. माझ्यावर आरोप झाले त्यानंतर जलसंपदा कामांची गती कमी झाली. मी मान्यता द्यायचो म्हणून मला टार्गेटे केले जाते. याबाबतचा अहवाल आला. पहिल्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटला मान्यता दिली नाही. आता या सगळ्यांच्या इतिहासात मला जायचं नाही, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

Ajit Pawar : मी आठवण करून दिली, पण जयंतराव एकवर्ष करत करत तिथेच; भुजबळांनंतर अजितदादांचाही टोला

आज मी 32 वर्षे मंत्रिमंडळात काम करत आहे. मी 10 वर्षे ऊर्जा खात्याचा मंत्री होतो. भारनियमनातून राज्याला मुक्त केलं होतं. आम्ही वचन पाळतो. अर्थ विभागही माझ्याकडे आहे. सहा लाख कोटींचं बजेट माझ्याकडे असते. डीपीसीच्याबाबतीत माझ्यावर कुणीही आरोप करू शकत नाही. जीएसटी विभाग माझ्याकडे आहे. प्रचंड कर संकलन या विभागात होतं. माझी नेहमीच स्पष्ट भूमिका असते. काम व्हावं हा माझा हेतू असतो. कार्यकर्त्यांचीही तीच भावना असते, असे अजित पवार म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज