Download App

इंडिया आघाडीच्या सभेला अखिलेश यादवांची दांडी, निवेदन जारी सांगितलं अनुपस्थित राहण्याचं कारण

  • Written By: Last Updated:

Akhilesh Yadav : शिवाजी पार्कवर सध्या भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Dodo Nyaya Yatra) समारोप सभा सुरू झाली आहे. या सभेला इंडिया आघाडीचे (India Alliance) सर्व बडे नेते सहभागी झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, एमके स्टॅलिन, फारुख अब्दुल्ला, प्रकाश आंबेडकर, तेजस्वी यादव आणि के. सी. वेणुगोपाल या सभेला उपस्ति झाले. मात्र, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) हे या सभेसाठी गैरहजर राहिले. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, यावर आता खुद्द अखिलेश यादव यांनी स्पष्टीकरण दिलं.

Elvish Yadav : सापाचं विष प्रकरण; युट्यूबर एल्विश यादवला अटक… 

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज यात्रेचा समारोप झाला. त्यानंतर ऐतिहासिक शिवतीर्थावर इंडिया आघाडीची मोठी जाहीर सभा होत आहे.या सभेसाठी इंडिया आघाडीचे दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. मात्र, अखिलेश यादव हे या सभेसाठी गैरहजर राहिलेत. दरम्यान, अखिलेश यादव यांनी एक निवेदन जारी करून मुंबईतील इंडिया आघाडीच्या सभेला उपस्थित न राहिल्याबद्दलचे कारण सांगितलं.  यादव यांनी निवेदनात लिहिलं की, निवडणूक आयोगाने यूपीमध्ये 20 मार्चपासून अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत, त्याच्या तयारीमध्ये गुंतल्यानं मी भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीत, असं त्यांनी निवेदनात म्हटलं.

इंडिया आघाडीच्या प्रचाराचा नारळ मुंबईतून फुटणार

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली असून आज शिवाजी पार्कमध्ये इंडिया आघाडीची सभा होत आहे. या सभेच्या निमित्ताने मुंबईतून इंडिया आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक नेते एम.के. स्टॅलिन, राष्ट्रीय जनता दलाकडून तेजस्वी यादव, राष्ट्रवादीकडून शरद पवार, शिवसेनेकडून उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. या सभेनंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांचीही बैठक होण्याची शक्यता आहे.

इंडिया आघाडीच्या दिग्गज नेत्यांचे शिवाजी पार्कवर उपस्थिती
राहुल गांधी, प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शरद पवार, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, वर्षा गायकवाड, एमके स्टॅलिन, रेवंत रेड्डी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, झारखंडच्या मुख्यमंत्री चंपाई सोरेन, काँग्रेस नेते अशोक गेहलोत, प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे, सचिन अहिर, जम्मू-काश्मीरच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती आदी नेते शिवाजी पार्कमध्ये उपस्थित आहेत.

follow us

वेब स्टोरीज