Akif Nachan : इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या दहशतवादी संघटनेला दहशतवाद्यांचा पुरवठा करण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देणाऱ्या मॉड्यूलवर एनआयएकडून (NIA) कठोर कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत एनआयएने यापूर्वी पुणे, ठाणे आणि इतर भागात कारवाई करून अनेक संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनंतर शनिवारी (5 ऑगस्ट) ISIS च्या महाराष्ट्र मॉड्यूलशी संबंधित सहावी अटक झाली. एनआयएच्या पथकाने आकिफ नाचनला (Akif Nachan) भिवंडीतील पडघ्यातून अटक केली. त्याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. (akif nachan arrested from bhiwandi by nia involvement in terror module)
https://www.youtube.com/watch?v=qnJFFUhQCYQ
एनआयएने अटक केल्यानंतर आकिफ नाचनला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयात युक्तिवाद करताना एनआयएच्या वकिलांनी दावा केला की, या सर्व दहशतवाद्यांचा हेतू मुंबईत दहशतवादी कारवाया करण्याचा होता. मात्र, त्यापूर्वीच या सर्वांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 6 जणांना अटक करण्यात आली असून त्यात आणखी लोकांचा सहभाग असण्याची शक्यता एनआयएने व्यक्त केली आहे. एनआयएने न्यायालयात दावा केला होता की नाचन आणि इतरांना परदेशी दहशतवादी संघटना प्रशिक्षण देत आहेत.
‘मन्नत’च्या बाल्कनीत सुहानाचे फोटोशूट, पाहा किलर लूक
या संशयित दहशतवाद्यांची चौकशी केली असता, हे लोक एकमेकांशी संवाद साधण्यासाठी व्हीपीएन (व्हर्च्युअल प्रॉक्सी नेटवर्क) वापरत असल्याचे आढळून आले. आकिफने या प्रकरणातील अन्य आरोपींना राहण्याची सोय केली होती, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला. एनआयएने केलेल्या आरोपात असेही म्हटले आहे की, आकिफ आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस) चाचणीत सामील होता.
एनआयने कोर्टसमोर दावा केला की, आकिफ इतर आरोपींसोबत मुंबईवर हल्ला करण्याची तयारी करत होता. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक्स साहित्य आणि बनावट कागदपत्रे तपास यंत्रणांकडून जप्त करण्यात आली.
याआधी महाराष्ट्राच्या विविध भागातून संशयित दहशतवाद्यांना तपास यंत्रणांनी अटक केली आहे. यातील दोघांना पुण्यातील कोथरूड तर एकाला रत्नागिरीतून पकडले.