Download App

आपल्या सणांवर बंदी आणायचा प्रयत्न झाला पण…राज ठाकरे गरजले !

  • Written By: Last Updated:

मुंबईः मुंबई, ठाणे शहरामध्ये दहीहंडीच्या उत्साह जल्लोषात साजरा केला जात आहे. अनेक मंडळाची दहीहंडी आठ, नऊ थर लावून फोडण्यात आली आहे. अनेक मंडळाने सिनेसृष्टीतील कलाकारांना आमंत्रित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही अनेक ठिकाणी हजेरी लावली. ठाण्यातील मनसेच्या (MNS) दहीहंडीचा कार्यक्रमात राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे.

‘आमचं आरक्षण त्यांन देऊ नका, अन्यथा…’, सरकारने जीआर काढल्यानंतर कुणबी समाज आक्रमक

दहीहंडी सणावर अनेक बंधने घालण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावर राज ठाकरे म्हणाले, हिंदू व मराठी सणांवर अनेक प्रकारे बंधने घालण्याचे प्रयत्न झाले आहेत. सरकारबरोबर अनेकदा न्यायालयाकडूनही हस्तक्षेप करण्यात आले. कोर्टानेही या सणावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मी काही झाले तर सण साजरे करेल. कोर्टाला करायचे ते करावे असे म्हटले होते, याची आठवणही राज ठाकरे यांनी यावेळी करून दिली.

तर याचबरोबर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनाही काही सूचना दिल्या आहेत. दहीहंडीच्या सर्वांना शुभेच्छा आहे. आपले सण नीटनेटकपणाने साजरे करावेत. कुणाला त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.

Khupte Tithe Gupte: राज ठाकरे यांच्यामधील खुपणारी गोष्ट कोणती? नावाकडे पाहून बिचुकले म्हणाला…

ठाण्यातील मनसेच्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. ढोलकीच्या तालावरही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.नौपाड्यामध्ये १० थर रचून दहीहंडीचा विक्रम करण्याच्या तयारीमध्ये पथके दाखल झाली होती. यात जय जवान पथकाने नऊ थर रचले होते. स्वतः राज ठाकरेंनी हा थरार पाहिला होता. राज ठाकरे स्वतः हजर असल्याने मनसैनिकांमध्ये मोठा उत्साह होता.

मराठी सणावर बंदी आणण्याचा डाव रचला होता

हिंदूंच्या ‘कृष्णजन्माष्टमी’ निमित्त साजरा होणाऱ्या ‘दहिहंडी’ या मराठी सणावर बंदी आणण्याचा डाव रचला गेला होता तेव्हा एक ‘राज’गर्जना झाली… मराठी मनगटं एकवटली, निकराने लढली आणि महाराष्ट्राचा ‘दहीहंडी’ सण टिकला…! असा व्हिडिओही मनसेकडून ट्वीट करण्यात आला होता.

Tags

follow us