Download App

…अन् आमदार जितेंद्र आव्हाड थोडक्यात बचावले, पहा नेमकं काय घडलं

ठाणे: मुंब्रा येथे भव्य क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमासाठी मुंब्रा विधानसभेचे आमदार आणि राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित राहिले होते. मात्र जसे जितेंद्र आव्हाड यांनी स्टेजवर हजेरी लावली तोच स्टेज खचला. सुदैवानं या अपघातात आमदार जितेंद्र आव्हाड यांना कोणतीही दुखापत झाली नाही आहे.

मुंब्रा येथे भव्य क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते. त्यात सामन्यांच्या सेमी फायनल व फायनल मॅच दरम्यान राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थिती दर्शवली होती. क्रिकेटच्या मंचावर आव्हाड हे पोहचले आणि काही क्षणातच तो स्टेज खचला.

सुदैवाने आमदार जितेंद्र आव्हाड हे या अपघातातून बचावले. घटना घडताच आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ आव्हाड यांना सावरत तेथून बाजूला केले. दरम्यान या घटनेमुळे आयोजकांची मोठी तारांबळ उडाली होती.

क्रिकेटचा सामना असल्याने यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी देखील गर्दी केली होती. यातच स्टेजवर मान्यवरांसाठी बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी स्टेजवर आमदार आव्हाड हे कार्यकर्त्यांसह पोहचले. आणि नेमकं त्याच वेळी ही दुर्घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

Tags

follow us