Anil Desai Summoned: ऐन निवडणूकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या (UBT) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे (EOW) शाखेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे नेते आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी अनिल देसाई यांना समन्स बजावले आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटालाच खरी शिवसेना (Shiv Sena) घोषित केल्यानंतरही ठाकरे गटाने शिवसेनेच्या खात्यातून पक्षनिधी काढून घेतल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. या तक्रारीची दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेने अनिल देसाई यांना ५ मार्चला चौकशीसाठी बोलावले आहे.
धर्मशाला कसोटीपूर्वीच भारत नंबर वन होणार? ऑस्ट्रेलियाच्या विजयावर गणित ठरणार
अनिल देसाई हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनीच शिंदे गटाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने अनिल देसाई यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती.
विशेष म्हणजे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत यावर भाष्य केले होते. या मुद्द्यावर त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता निशाणा साधला होता. आम्हाला ‘खोके-खोके’ म्हणत त्यांनी आमच्या खात्यातून 50 कोटी रुपये काढून घेतले, असा आरोप केला होता. त्यानंतर आता या कारवाईला वेग आला आहे.
तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम का झालं नाही? कोल्हेंचा अजितदादांना बोचरा सवाल
अनिल देसाईंवर काय आरोप आहेत?
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्ष कोणाचा, यावरून कायदेशीर वाद निर्माण झाला होता. हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला होता. एकनाथ शिंदे गट हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला होता. त्याचवेळी अनिल देसाई यांनी शिवसेनेच्या बँक खात्यातून तातडीने 50 कोटी रुपये काढले. ही बाब नंतर शिंदे गटाच्या निदर्शनास आली. याविरोधात त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली. त्यामुळे आता अनिल देसाई यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. येत्या काही दिवसांत त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. दरम्यान, देसाई 50 कोटी रुपयांच्या रक्कमेबाबत काय स्पष्टीकरण देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.
या नेत्यांवर तपास यत्रणांचा वक्रदृष्टी
ज्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंऐवजी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवला आहे, त्यापैकी जवळपास सर्वच नेत्यांच्या मागे तपास यंत्रणा आहेत. या नेत्यांमध्ये खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, रवींद्र वायकर, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक यांचा समावेश आहे. यापैकी संजय राऊत यांना ईडीच्या कारवाईमुळे काही महिने तुरुंगात काढावे लागले होते. अनिल परब, रवींद्र वायकर, राजन साळवी यांच्या घरांवरही तपास यंत्रणांनी छापे टाकले होते.