तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम का झालं नाही? कोल्हेंचा अजितदादांना बोचरा सवाल

तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम का झालं नाही? कोल्हेंचा अजितदादांना बोचरा सवाल

Amol Kolhe : आज वढू तुळापूर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या समाधी स्थळाचं भूमिपूजन करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा पार पडला. दरम्यान, या भूमिपूजन कार्यक्रमावरून खासदार अमोल कोल्हेंन (Amol Kolhe) सरकावर निशाणा साधला.

भाजपची पहिली यादी जाहीर; दिग्गजांना घरी बसवले, नवीन चेहऱ्यांवर डाव 

ज्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास होतो आहे, त्यांचा फोटो कुठल्याही फ्लेक्सवर, जाहिरातींवर नसावा हा तमाम शंभुभक्तांचा, त्यांच्या भावनांचा अपमान आहे, अशा शब्दांत कोल्हेंनी टीका केली. हा भूमिपूजन सोहळा राजकीय इव्हेंट बनल्याचंही ते म्हणाले.

मुंबईने सर्वकाही दिले; आता जन्मभूमीतून नशिब अजमाविणार, कृपाशंकर सिंह यूपीतून लोकसभेच्या आखाड्यात ! 

भूमिपूजन पार पडल्यानंतर खासदार कोल्हेंनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या विकासासाठी भूमिपूजन सोहळा आयोजित केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मात्र, गेली ३३४ वर्षे ही समाधी, हे स्मारक या ठिकाणी असल्याची आठवण करुन देताना काही लोकं १५ वर्षे या भागाचे खासदार होते. स्वतः अजितदादा साडेतेरा वर्ष पालकमंत्री होते. त्यावेळी या स्मारकाचे काम का झाले नाही असा बोचरा सवाल कोल्हेंनी केला.

ते पुढे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत तेजस्वी इतिहास १५७ देशात पोहोचविण्यात खारीचा वाटा उचलू शकलो ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळेच २०१९ नंतर मी आणि आमदार अशोकबापू पवार यांनी सातत्याने या समाधी स्थळाचा विकास व्हावा यासाठी मागणी व पाठपुरावा सुरू केला, त्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर हे भूमिपूजन होत आहे, यासाठी मी मनापासून आभारी आहे. दुसरं म्हणजे कोनशिलेवर नाव नसलं तरी काळजावर कुणाचं नाव कोरलंय हे मायबाप जनता जाणते अशा शब्दांत कोनशिलेवरील नाव वगळण्याच्या प्रकाराचा समाचार घेतला.

गेल्या दोन दिवसांपासून हा भूमिपूजन सोहळ्याचा वाद रंगलेला होता. या वादात कार्यक्रम पत्रिका वारंवार बदलावी लागली. त्यामुळे काल रात्री उशिरा म्हणजे १०.४२ वाजता कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हा विषय आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याने आपण या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहिलो असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

कोल्हेंना बोलण्याची संधी नाकारली
दरम्यान, या भूमिपूजन सोहळ्यात अमोल कोल्हे आणि आमदार अशोकबापू पवार यांना बोलण्याची संधी मिळणं आवश्यक होतं. परंतु संपूर्ण कार्यक्रमाला राजकीय इव्हेंटचे स्वरुप दिल्यामुळे या दोघांनाही बोलण्याची संधी दिली नसल्याची चर्चा परिसरात रंगली होती. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगभरात पोहोचविणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना बोलण्याची संधी नाकारल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube