Anil Parab on Rahul Narwekar : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीत चालढकल केल्याने विधानसभा अध्यक्षांना शेलक्या शब्दांत सुनावलं आहे. त्यानंतर आता त्या आमदारांच्या सुनावणीच्या प्रक्रियेच्या घडामोडीला वेग आला आहे. त्यावरुन आता विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab)यांच्या कामावर टीका केली आहे.
Sunil Tatkare : सुळेंच्या ‘त्या’ विधानावर सुनिल तटकरे बोलले; ‘दादांसारखा भाऊ..,’
यावेळी Anil Parab म्हणाले की, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर ही सुनावणी सुरु होत आहे. अद्याप सुनावणी सुरु झालेली नाही, असेही परब म्हणाले. काही दिवसांपासून आम्हाला कोणतीही कागदपत्रं मिळाली नाहीत असं सांगून वेळ मारुन नेली जात असल्याचा आरोपही यावेळी अनिल परब यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याबद्दल स्पष्ट भूमिका घेतली आहे. एका आठवड्याच्या आत सुनावणीबद्दलचं वेळापत्रक द्यायला सांगितलं आहे. आता कुणाचीही सुटका होणार नाही. विधानसभा अध्यक्षांना त्या आमदारांचा निर्णय घ्यावाच लागणार आहे, असेही आमदार अनिल परब म्हणाले.
ज्याप्रमाणे विधानसभेत अध्यक्षांनी चालढकल केली तशीच विधान परिषदेमध्ये देखील टंगळमंगळ करण्यात येत आहे. Anil Parab म्हणाले, मी सांगितलं होतं की, सभापती किंवा उपसभापती अपात्रतेचा निर्णय घेतात. मात्र उपसभापतींवरच अपात्रतेची याचिका आहे. मग ही सुनावणी कोण घेणार? त्याबद्दल सरकारनं सांगितलं होतं की, यासाठी एखाद्या ज्येष्ठ सदस्याची नियुक्ती करील. पण त्याचं पुढं काहीच झालं नाही. त्यामुळे आम्हाला शेवटी न्यायालय हा एकच पर्याय उरतो, असा थेट इशाराही अनिल परब यांनी दिला आहे.
मनीषा कायंदे, बिप्लव बाजोरिया यांच्या याचिका उपसभापती ऐकतील कारण जोपर्यंत त्या अपात्र ठरत नाहीत, तोपर्यंत त्या सभापती राहतील, म्हणून त्यांच्या याचिका ऐकण्याचा अधिकार उपसभापती नीलम गोऱ्हे यांना आहे. असा निर्णय त्यावेळचे तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी दिला आहे. परंतु या सगळ्या गोष्टी आता चॅलेंजिंग ठरणार आहेत. त्यापुढेही त्यांनी टंगळमंगळ केली तर जसं खालच्या सभागृहात न्यायालयाने दट्ट्या मिळाला तसाच वरच्या सभागृहाला मिळेल, असा इशाराही ठाकरे गटाचे आमदार Anil Parab यांनी दिला आहे.