Ramesh Bidhuri Controversy : मुल्ला उग्रवादी, दहशतवादी, याचं काही ऐकू नका, बाहेर फेकून द्या; भाजप खासदाराची लोकसभेतच शिवीगाळ

Ramesh Bidhuri Controversy : मुल्ला उग्रवादी, दहशतवादी, याचं काही ऐकू नका, बाहेर फेकून द्या; भाजप खासदाराची लोकसभेतच शिवीगाळ

Ramesh Bidhuri Controversy : संसदेच्या विशेष अधिवेशनात विविध विषयांच्या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. लोकसभेत चांद्रयान-3 च्या यशाची चर्चा सुरु होती. त्यावेळी दिल्लीतील भाजप खासदार रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri)यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली. चांद्रयान 3 (Chandrayaan 3)च्या यशाबद्दल चर्चा करताना रमेश बिधुरी यांनी अनेक आक्षेपार्ह विधानं केली.

आपल्या भाषणामध्ये ते म्हणाले की, त्यांनी काम केले आहे याचे श्रेय पंतप्रधानांना द्यावे लागेल. त्याचवेळी खासदार दानिश यांचा आवाज ऐकून बिधुरी संतापले. त्यावेळी ए भ** ए उग्रवादी तुला उभा राहून बोलू देणार नाही सांगून ठेवतो. हे मुल्ला उग्रवादी, दहशतवादी आहेत. याचं काही ऐकू नका, बाहेर फेकून द्या याला असं खासदार दानिश यांना दहशतवादी म्हणत शिवीगाळ केली.

संजय राऊत वैयक्तिक आयुष्यात शक्ती कपूर यांच्यासारखा…; नितेश राणेंची घणाघाती टीका

शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. भाजपच्या खासदाराने केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मात्र माफी मागितली.

या व्हिडीओमध्ये लोकसभेतला आहे. यामध्ये खासदार रमेश बिधुरी हे भाषण करत आहेत. चांद्रयान मोहिमेचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाटल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावर खासदार रमेश बिधुरी संतापले. रागाच्या भरात त्यांनी थेट शिवीगाळ केली.

अहमदनगर : आईच्या झोपेच्या गोळ्या अन् दरोड्याचा बनाव : पत्नीने थंड डोक्याने काढला पतीचा काटा

व्हिडीओमध्ये रमेश बिधुरी म्हणतात की, मोदींनी श्रेय लाटलं नाही. विरोधकांनी यावर बोलायला सुरुवात केल्यानंतर मात्र बिधुरी भडकले. पंतप्रधान मोदी श्रेय घेत नाहीत. याचे श्रेय देशाचे वैज्ञानिक घेत आहेत. ए भडवे ए उग्रवादी तुला उभा राहून बोलू देणार नाही सांगून ठेवतो. हे मुल्ला उग्रवादी, दहशतवादी आहेत. याचं काही ऐकू नका, बाहेर फेकून द्या याला असं या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.

खासदार रमेश बिधुरी यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन विरोधी पक्षांकडून घणाघाती टीका सुरु झाली आहे. विरोधकांनी या घटनेवरुन संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सभागृहातच दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, सत्ताधारी सदस्याच्या कोणत्याही वक्तव्याने विरोधी पक्षांच्या भावना दुखावल्या असल्यास त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube