भिवंडीमध्ये पवारांकडून बाळ्यामामांना उमेदवारी… साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाणांचा मार्ग मोकळा?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आणखी दोन उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात भिवंडीमधून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे (Suresh Mhatre) आणि बीडमधून बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यापूर्वी वर्धा, दिंडोरी, शिरुर, बारामती आणि अहमदनगर या मतदारसंघांमधून उमेदवार जाहीर करण्यात आले होते. आता […]

Sharad Pawar Prithviraj Chavhan

Sharad Pawar Prithviraj Chavhan

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आणखी दोन उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात भिवंडीमधून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे (Suresh Mhatre) आणि बीडमधून बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यापूर्वी वर्धा, दिंडोरी, शिरुर, बारामती आणि अहमदनगर या मतदारसंघांमधून उमेदवार जाहीर करण्यात आले होते. आता माढा आणि रावेर या तीन जागांवरील उमेदवारांची घोषणा होणे अद्याप बाकी आहे.

सातारा काँग्रेसला जाणार?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेसमध्ये भिवंडी-सातारा या दोन जागांवरुन वाद सुरु होते. काँग्रेसकडील भिवंडी जागेवर शरद पवार यांनी दावा सांगितला होता. त्यामुळे ही जागा कोणाकडे जाणार याकडे लक्ष लागले होते. अशात साताऱ्यामध्ये भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यांच्याविरोधात विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल असे निश्चित मानले जात होते.

Bihar Politics : उमेदवार निवडीत पॉलिटिक्स; एकाच वेळी 22 नेत्यांनी सोडली चिराग पासवानांची साथ

मात्र पाटील यांनी तब्येतीच्या कारणास्तव माघार घेतली. त्यानंतर पवारांकडे साताऱ्यातून सक्षम उमेदवार नसल्याने भिवंडीच्या बदल्यात सातारा काँग्रेसला सोडून उदयनराजे यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. अशात आता पवारांनी भिवंडीमधून उमेदवार जाहीर केल्याने साताऱ्याची जागा काँग्रेसला सोडण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

माढा अन् रावेरमध्ये कोण असणार उमेदवार?

महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गट नऊ जागा लढविणार आहे. यात आतापर्यंत सात जागांवर उमेदवारांची घोषणा झाली आहे. तर अद्यार माढा आणि रावेर या जागांवर उमेदवारांची घोषणा बाकी आहे.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे उमेदवार?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 21 उमेदवार

1. बुलढाणा – नरेंद्र खेडकर

2. यवतमाळ – संजय देशमुख

3. परभणी – संजय जाधव

4. हिंगोली – नागेश आष्टीकर

5. छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे

6. धाराशिव – ओमराजे निंबाळकर

7. नाशिक – राजाभाई वाजे

8. जळगाव – करण पवार

9. शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे

10. सांगली – चंद्रहार पाटील

11. हातकणंगले – सत्यजीत पाटील

12. मावळ – संजोग वाघेरे-पाटील

13. रायगड – अनंत गीते

14. सिंधुदुर्ग, रत्नागिरी – विनायक राऊत

15. ठाणे – राजन विचारे

16. पालघर – भारती कामडी

17. कल्याण – वैशाली दरेकर

18. मुंबई-उत्तर पूर्व – संजय दिना पाटील

19. मुंबई उत्तर पश्चिम – अमोल किर्तीकर

20. मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत

21. मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई

शिवसेनेच्या उमेदवारासाठी PM मोदींची महाराष्ट्रात पहिली सभा… विदर्भातून फुंकणार प्रचाराचे रणशिंग

काँग्रेस – 18 उमेदवार

1. कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती

2. पुणे – रवींद्र धंगेकर

3. सातारा – अद्याप घोषणा नाही

4. सोलापूर – प्रणिती शिंदे

5. अकोला – डॉ. अभय पाटील

6. नागपूर – विकास ठाकरे

7. रामटेक – श्यामकुमार बर्वे

8. चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर

9. गडचिरोली-चिमूर – नामदेव किरसान

10. भंडारा-गोंदिया – प्रशांत पडोळे

11. अमरावती – बळवंत वानखेडे

12. नांदेड – वसंतराव चव्हाण

13. लातूर – डॉ.शिवाजी काळगे

14. जालना – अद्याप घोषणा नाही

15. नंदुरबार – गोवल के पाडवी

16. धुळे – अद्याप घोषणा नाही

17. मुंबई उत्तर – अद्याप घोषणा नाही

18. मुंबई उत्तर मध्य – अद्याप घोषणा नाही

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – 9 उमेदवार

1. वर्धा – अमर काळे

2. दिंडोरी – भास्कर भगरे

3. शिरुर – डॉ. अमोल कोल्हे

4. बारामती – सुप्रिया सुळे

5. अहमदनगर – निलेश लंके

6. बीड – बजरंग सोनवणे

7. भिवंडी – सुरेश म्हात्रे

8. माढा – अद्याप घोषणा नाही

9. रावेर – अद्याप घोषणा नाही

Exit mobile version