शिवसेनेच्या उमेदवारासाठी PM मोदींची महाराष्ट्रात पहिली सभा… विदर्भातून फुंकणार प्रचाराचे रणशिंग

शिवसेनेच्या उमेदवारासाठी PM मोदींची महाराष्ट्रात पहिली सभा… विदर्भातून फुंकणार प्रचाराचे रणशिंग

Loksabha Election : देशात लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) बिगुल वाजलं आहे. सर्वच पक्षांकडून प्रचाराची जोरदार तयारी सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता भाजपकडूनही (BJP) अखेर प्रचाराची तारीख घोषित करण्यात आली आहे. भाजपने प्रचाराची तारीख घोषित केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची धास्ती वाढली असल्याचं दिसून येत आहे. येत्या 6 एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) विदर्भातून प्रचाराचा नारळ फोडणार असून 10 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा रामटेकमध्ये पार पडणार आहे. त्यानंतर 14 एप्रिलला चंद्रपुरात मोदींची दुसरी सभा होणार असल्याची माहिती भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

“खासदार साहेब पाच वर्ष कुठं होता?” मतदारांचा सवाल; शिरुरमध्ये रंगलय बॅनर पॉलिटिक्स!

प्रविण दरेकर म्हणाले, पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपसह एनडीएतील सर्वच पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारासह बुध कॅम्पेनिंगच्या सूचना संबंधितांना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. येत्या 10 तारखेला पहिला जाहीर सभा रामटेकला होणार असून या सभेला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी दीक्षाभूमीलाही भेट देणार आहेत. तर 14 एप्रिलला चंद्रपुरात सभा होणार असल्याचं प्रविण दरेकरांनी सांगितलं आहे.

प्रतिस्पर्ध्याबद्दल आदर व्यक्त करणे ही भारतीय संस्कृती…, विरोधकांच्या टीकेला जयंत पाटलांचे प्रत्युत्तर

विदर्भातून भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षाकडून अनेक शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी भाजपने प्रचाराची सुरुवातच विदर्भातून करण्याची रणनीती आखली आहे. येत्या 6 एप्रिला रोजी केंद्रीय मंत्री अमित शाहा विदर्भातून प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत. त्यामुळे अखेर प्रचाराच्या तोफा आता जोरदार सुरु होणार असल्याचं दिसून येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज