Download App

Assembly Elections : 5 राज्यांच्या निवडणुका मोदी सरकारला निरोप ठरणार; ठाकरे गटाचा जोरदार हल्ला

Assembly Elections : पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections ) तारखा निवडणूक आयोगाने सोमवारी (9 ऑक्टोबर) जाहीर केल्या आहेत. यात राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरामचा समावेश आहे. यानंतर विविध पक्षांकडून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. त्यामध्ये ठाकरे गटाने त्यांचं मुखपत्र सामनातून भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

5 राज्यांच्या निवडणुका मोदी सरकारला निरोप ठरणार…

सामनाच्या अग्रलेखात ठाकरे गटाने म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये जाऊन आरोपांच्या फैरी झाडत होते तेव्हाच पाच राज्यातील निवडणुका जाहीर होणार हे स्पष्ट झाले होते. त्यात निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली ते लोकशाहीवर उपकारच झाले. अशी टीका करताना ठाकरे गटाने म्हटले की, पाच राज्यांच्या निवडणुका इंडिया आघाडीसाठी शुभ शकून तर मोदी सरकारच्या निरोपाची नांदी ठरणार आहे.

राऊतांनी बाण सोडला! शिंदेंचा खास शिलेदार पाठीत खंजीर खुपसून भाजपमध्ये जाणार

तसेच पुढे सामनामध्ये म्हटले आहे की, आता या राज्यांमध्ये घोषणा, आश्वासने, जाहीर सभा, रोड शो यांचा गदारोळ सुरू आहेच मात्र निवडणुका जाहीर झाल्याने त्याला आणखी वे येईल. या राज्यांतील निवडणुका सत्ताधारी आणि विरोधकांसाठी सेमी-फायनल असणार आहे. तर भाजपने कितीही एनडीएची गोळाबेरीज केली तरी पाच राज्य आणि आगामी लोकसभांमध्ये त्याची वजाबाकीच ठरणार आहे. अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

World Cup : टीम इंडियाची टेन्शन वाढलं; दिग्गज शुभमन गिल रूग्णालयात दाखल

कर्नाटकप्रमाणे पाच राज्यांमध्ये देखील जनतेच्या मनातील बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच इतर गोष्टींविषयीची खदखद बाहेर येणार आहे. भाजप जो जिंकण्याचा आव आणत आहे तो वरकरणी आहे. तर मध्यप्रदेशात भाजप श्रेष्ठींनाच शिवराज सिंग चव्हाण यांना बाजूला करायचे आहे. त्याचबरोबर राजस्थानात वसुंधरा राजेंना बाजूला केल्याने अंतर्गत राजकारणाला भाजपला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आगामी पाच राज्यांतील निवडणुका या भाजपच्या आणि मोदी सरकारच्या निरोपाची नांदी ठरणार असल्याचं ठाकरे गटाने म्हटलंय.

Tags

follow us